बीजिंग : देशात यावर्षी आयोजित करण्यात येणार्या ‘ग्लिंप्सिस आॅफ इंडिया’ या महोत्सवाद्वारे भारताच्या मंत्रमुग्ध करणार्या व रहस्यमयी सांस्कृतिक वारशाचे चिनी नागरिकांना दर्शन घडेल आणि त्यांची भारतीय संस्कृतीबाबतची जिज्ञासा शमेल, असे चीनने म्हटले आहे. रविवारी रात्री महोत्सवाचे उद्घाटन करताना चीनचे सहायक परराष्ट्रमंत्री लियू जियानचाओ म्हणाले की, भारतीय आणि चिनी समाज प्राचीन काळापासून एकमेकांपासून शिकत आले असून दोघांनी मिळून अनेक उत्तुंग कामगिरी केल्या आहेत. चेन्नईतील प्रसिद्ध नृत्यसंस्था कलाक्षेत्रच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमास प्रारंभ झाला. लियू म्हणाले की, चीनचे लोक आजही भारताच्या रहस्यमयी संस्कृतीने मंत्रमुग्ध असून भारतीय संस्कृतीत दडलेल्या ज्ञानाचा खजिना हुडकून त्याचा अवलंब करू इच्छितात. (वृत्तसंस्था) हा महोत्सव पाहण्यासाठी पॉली थिएटरमध्ये १६०० नागरिक उपस्थित होते व त्यातील बहुतांश चिनी वंशाचे होते. (वृत्तसंस्था)
भारतीय संस्कृतीचे चीनच्या नागरिकांना आकर्षण
By admin | Updated: May 13, 2014 04:45 IST