शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कमांडरला टिपण्यासाठी गाझावर हल्ले, ७१ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 10:26 IST

२८९ जखमी; शस्त्रसंधीच्या चर्चा पुन्हा थांबण्याची भीती

जेरुसलेम : हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद डेफ याला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने गाझावर शनिवारी केलेल्या हल्ल्यात सुमारे ७१ जणांचा मृत्यू तर २८९ जण जखमी झाल्याचा दावा गाझातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. मृतांमध्ये डेफ याचा समावेश आहे का, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र हा कमांडर मारला गेल्यास इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या चर्चेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

मोहम्मद डेफचा मृतांमध्ये समावेश नसल्याचे हमासने म्हटले आहे. हमासचा आणखी एक कमांडर राफा सलामा याचाही खात्मा करण्याचा इस्रायलचा विचार होता. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून १२०० लोकांची हत्या केली. 

‘डेफ मारला गेलेला नाही’

हमासने म्हटले आहे की, डेफ हल्ल्यात मारला गेल्याच्या चर्चेत तथ्य नाही. इस्रायलकडून सुरु असलेला नरसंहार झाकण्यासाठी या चर्चा होत असतात. शनिवारी हल्ल्यात २८९ जण जखमी झाले, अशी माहिती गाझातील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हे युद्ध संपुष्टात आणावे म्हणून अमेरिका तसेच युरोपीय देशांनी केलेली मागणी इस्रायलने अमान्य केली होती. हमासचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असेही इस्रायलने म्हटले होते. 

दहशतवादी नागरी वस्त्यांत दडले 

इस्रायलने दावा केला की, हमासचे दहशतवादी हे मागील अनेक महिन्यांपासून नागरी वस्त्यांमध्ये लपून बसले आहेत. परंतु तिथूनही ते आपल्या घातपाती कारवाया चालवित आहेत. गाझामध्ये शनिवारी मोठा हल्ला करण्यात आला.  हल्ला केलेला भाग इमारती, झाडांनी वेढलेला आहे. इस्रायलने केलेल्या बॉम्बच्या हल्ल्यांनंतर गाझातील त्या भागात जळालेले तंबू, कार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅकIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष