शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Attack On Russian Warship: युक्रेनच्या हाती अलकायदाचे शस्त्र लागले! रशियाची आणखी एक युद्धनौका बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 11:23 IST

रशियाच्या या तळावर एकामागोमाग एक असे अनेक जोरदार हल्ले झाले. यामागे ब्रिटनच्या तज्ज्ञांचा हात असल्याचा आरोप रशियाने केला आहे.

युक्रेनने रशियन नौदलाच्या एका मोठ्या तळावर भीषण हल्ला केला आहे. पाण्यातून वार करणाऱ्या ड्रोनने रशियाची दुसरी महत्वाची युद्धनौका बुडविली आहे. यामुळे रशियाला एकतर सर्व युद्धनौका परत बोलवाव्या लागण्याची किंवा त्यांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर सामग्री तैनात करण्याची वेळ आली आहे. 

रशियन नौदलाचा क्रिमीयामध्ये एक मोठा नाविक तळ आहे. यावर मोठमोठ्या युद्धनौका तैनात आहेत. काही महिन्यांपूर्वी युक्रेनने रशियाची सर्वात शक्तीशाली एडमिरल मोस्‍कवा उध्वस्त केली होती. तिची जागा घेण्यासाठी आलेली रशियाची मिसाईल क्रूझ फ्रीगेट मकरोवचा शोध युक्रेनकडून सुरु होता, परंतू त्याला यश येत नव्हते. अखेर पाण्याखालून वार करणाऱ्या ड्रोनने ही युद्धनौका शोधली आणि तिच्यावर हल्ला चढविला. 

रशियाच्या या तळावर एकामागोमाग एक असे अनेक जोरदार हल्ले झाले. यामागे ब्रिटनच्या तज्ज्ञांचा हात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. सुमारे १५ हवेतील आणि पाण्यातील ड्रोननी हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. काळ्या समुद्रातील सेवास्‍तोपोल या नाविक तळावर हा हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पाण्याखालील ड्रोन अलकायदा आणि यहुती विद्रोहींकडून वापरला जातो. युक्रेनक़डे एवढे शक्तीशाली नौदल नसताना देखील एवढा खतरनाक ड्रोन हाती लागल्याने रशियाचे धाबे दणाणले आहेत. 

हा युक्रेनियन आत्मघाती ड्रोन स्पीड बोटच्या आकाराचा होता आणि त्यात शेकडो किलोग्रॅम स्फोटके होती. सागरी ड्रोनला रोखण्यासाठी रशियाने हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. रशियाने देखील एक युद्धनौका उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. या नाविक तळावर रशियाची ३०-४० युद्धनौका तैनात आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया