शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

भगवान जगन्नानाथाने ट्रम्प यांचा जीव वाचवला, त्या गोष्टीची परतफेड! ४८ वर्षांपूर्वी काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 14:51 IST

Jagannath Rath Yatra And Donald Trump News: ४८ वर्षांपूर्वी काय घडले होते? डोनाल्ड ट्रम्प यातून थोडक्यात बचावले, यात भगवान जगन्नाथ यांचा हस्तक्षेत निश्चितपणे जाणवतो, असे का म्हटले जात आहे? जाणून घ्या...

Jagannath Rath Yatra And Donald Trump News: अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेला संबोधित करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाच्या अवघ्या २ सेंटीमीटरवरून गोळी गेली, असे सांगितले जात आहे. या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांनी, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर ठार झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेकांनी या गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यानंतर आता भगवान जगन्नाथ यांच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचला असा दावा करण्यात आला आहे. 

या घटनेनंतर इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक्सवर एक पोस्ट करून यासंदर्भात दावा केला आहे. तसेच याबाबतीत ४८ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला आहे. ४८ वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांचा जीव वाचला. भगवान जगन्नाथ यांनी त्या गोष्टीची परतफेड केली, असे राधारमण दास यांनी म्हटले आहे. 

दैवी हस्तक्षेप झाला, हेच दिसते

होय, हा निश्चितपणे दैवी हस्तक्षेप आहे. बरोब्बर ४८ वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सवाला अभय दिले होते. आताच्या घडीला जगन्नाथ रथयात्रा उत्सव पुन्हा जगभर साजरा करत असतानाच ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि जगन्नाथ यांनी त्यांना वाचवून परतफेड केली. जुलै १९७६ मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्कॉनच्या भाविकांना रथांच्या निर्मितीसाठी त्यांचे ट्रेन यार्ड मोफत देऊन रथयात्रा आयोजित करण्यात मदत केली होती. जगन्नाथ रथयात्रेचा आता ९ वा दिवस सुरू आहे. जगन्नाथ रथयात्रा सुरू असताना त्यांच्यावर झालेला हा भयंकर हल्ला आणि त्यातून ते थोडक्यात बचावले, यातून दैवी हस्तक्षेप झाला, हेच दिसते, असे राधारमण दास यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे कृष्णभक्तांसाठी आशेचा किरण म्हणून धावून आले

डोनाल्ड ट्रम्प १९७६ मध्ये ३० वर्षांचे होते. रिअल इस्टेटमधील एक उदयोन्मुख चेहरे होते. त्यावेळी त्यांनी जे सहकार्य केले, त्यामुळे महाप्रभू जगन्नाथ यांची पहिली रथयात्रा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर निघाली होती. ४८ वर्षांपूर्वी इस्कॉनने न्यूयॉर्कमध्ये पहिली रथयात्रा आयोजित करण्याची योजना आखली होती, तेव्हा समोर अनेक आव्हाने होती. फिफ्थ अव्हेन्यू येथे परेडसाठी परवानगी देणे हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. परंतु रथ बांधता येईल, अशी एक मोठी रिकामी जागा शोधणेही सोपे नव्हते. त्यांनी शक्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दरवाजे ठोठावले, परंतु सर्व व्यर्थ झाले. तेव्हाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कृष्णभक्तांसाठी आशेचा किरण म्हणून धावून आले, असे दास यांनी सांगितले.

ट्रम्प काही वेगळे का करतील, अशी शंका मनात आली होती

इस्कॉनने १९७६ मध्ये १० वा वर्धापन दिन साजरा केल्यामुळे न्यूयॉर्कमधील भक्त तेथे पहिल्या मोठ्या रथयात्रेची योजना करत होते. आम्हाला फिफ्थ ॲव्हेन्यू वापरण्याची परवानगी होती, जी खरे तर खूप मोठी गोष्ट ठरली. मोठे लाकडी रथ बांधण्यासाठी आम्हाला परेड मार्गाच्या सुरुवातीच्या ठिकाणाजवळ एक रिकामी जागा हवी होती. आम्ही विचारले प्रत्येकजण नाही म्हणाला. त्यांना विम्याच्या जोखमींबद्दल चिंता होती, जे समजण्यासारखे आहे. भाविकांची हतबलता शिगेला पोहोचली होती, आशा जवळपास पल्लवित झाल्या होत्या. जवळपास सर्वच फर्म मालकांनी ज्यांना संपर्क साधला होता त्यांनी सांगितले की, ते पेनसिल्व्हेनिया रेल्वे यार्डमधील मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेत होते, जे कार्ट बनवण्यासाठी योग्य स्थान म्हणून निवडले गेले होते. काही दिवसांनी त्यांना कोणीतरी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी जुने रेल्वे यार्ड विकत घेतले आहे. पण तरीही चिंता होती कारण त्यांच्या पूर्वी डझनभर इतर जमीनदारांनी आधीच नाही म्हटले होते आणि ट्रम्प काही वेगळे का करतील, अशी शंका मनात आली होती, असे दास म्हणाले.

कागदपत्रांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली 

तरीही, भाविक महाप्रसादाची मोठी टोपली आणि सादरीकरण पॅकेज घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात गेले. त्याच्या सेक्रेटरीने ते घेतले पण भक्तांना ताकीद दिली, ते या प्रकाराशी कधीच सहमत नाही. तुम्ही विचारू शकता पण ते नाही म्हणतील. तीन दिवसांनंतर, ट्रम्पच्या सेक्रेटरीने फोन करून सांगितले की, काय झाले ते मला माहिती नाही, परंतु त्यांनी तुमचे पत्र वाचले, तुम्ही दिलेला महाप्रसाद घेतला. आणि लगेच म्हणाले, नक्कीच, का नाही? पुढे सेक्रेटरी म्हणाले की, खाली या आणि त्याच्या स्वाक्षरीचे परवानगीचे पत्र घेऊन जा. होय, रथयात्रातील रथ बांधण्यासाठी खुल्या रेल्वे यार्डांचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या कागदपत्रांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली होती.

पोलीस प्रमुखांनी हसतमुखाने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली

परेड परमिटसाठी मान्यता मिळणे हे भाविकांना तोंड द्यावे लागणारे आणखी एक कठीण काम होते. हरे कृष्णा चळवळीचे तोसन कृष्ण दास यांनी अधिकाऱ्यांना लेखी प्रस्ताव सादर केला होता. पोलिस विभागाने सुरुवातीला होकार दिला होता.  पण पुन्हा त्यांनी नकार असल्याचे कळवले. कारण १९६२ पासून फिफ्थ ॲव्हेन्यूवर नवीन परेडला परवानगी देण्याविरुद्ध महापौरांचा आदेश होता. कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे, टोसनने शेवटी मॅनहॅटनमधील पोलिस प्रमुखांकडे संपर्क साधला. मुख्याधिकारी अर्जाला कसा प्रतिसाद देतील याबद्दल कोणालाच सुगावा नव्हता. पण बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलीस प्रमुखांनी हसतमुखाने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. मी हे का करत आहे हे मला माहिती नाही, असे त्या प्रमुखाने सांगितले आणि त्यावर स्वाक्षरी केली, असे तोसन यांनी तेव्हा सांगितले. इतर कॉर्पोरेट कंपनी मालकांप्रमाणे, ट्रम्प सहजपणे प्रस्ताव नाकारू शकले असते. पोलीस प्रमुखही त्याला अपवाद नाहीत असे भाविकांना वाटत होते. त्यांनी नाही का म्हटले नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, परंतु, भक्तांनी ते भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद म्हणून ते मान्य केले, अशी एक दीर्घ आठवण राधारमण दास यांनी यानिमित्ताने सांगितली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राAmericaअमेरिका