शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार दडपणारा धर्मगुरू दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:09 IST

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; चार दशकानंतर लागला निकाल

न्यूकॅसल (आॅस्ट्रेलिया) : सिडनी शहराच्या उत्तरेस हंटर व्हॅली भागातील चर्चमध्ये एका धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पोलिसांना न कळविता दडपून टाकल्याबद्दल येथील न्यायालयाने अ‍ॅडलेडचे आर्चबिशप फिलिप विल्सन यांना दोषी ठरविले. बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यासाठी दोषी ठरणारे विल्सन हे रोमन कॅथलिक चर्चचे जगातील सर्वात उच्चपदस्थ अधिकारी आहेत.फादर जेम्स फ्लेचर यांनी १९७० च्या दशकात केलेल्या लैंगिक अत्याचारांशी संबंधित हे प्रकरण आहे. दंडाधिकारी रॉबर्ट स्टोन यांनी ६४ वर्षांचे आर्चबिशप विल्सन यांना दोषी ठरविणारा निकाल जाहीर केला. शिक्षेचा निकाल ९ जून रोजी दिला जाईल. तोपर्यंत विल्सन यांना जामीन मंजूर केला गेला.लैंगिक अत्याचार झाले तेव्हा ही मुले अनुक्रमे १० व ११ वर्षांची होती. पापाची कबुली देण्यासाठी आपण एकटेच धर्मवेदीपाशी गेलो तेव्हा फादर फ्लेचर यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी साक्ष या दोघांनी न्यायालयात दिली. या घटना घडल्या, तेव्हा या मुलांच्या कुटुंबीयांनी चर्च प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्या दडपल्या गेल्या. अ‍ॅडलेड धर्मक्षेत्राचे प्रमुख या नात्याने याबद्दल आर्चबिशप विल्सन यांना दोषी ठरविले गेले. (वृत्तसंस्था)चिलीतील सर्व बिशपचे राजीनामेचिलीमध्ये बिशपकडून असे प्रकार घडल्याचे लक्षात येताच पोप फ्रान्सिस यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यात सारी प्रकरणे दडपून टाकण्यासाठी पुरावे नष्ट केल्याचे आढळून आल्याने पोपनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर देशातील सर्व म्हणजे ३४ बिशपनी राजीनामे दिले. आता नवे चांगले बिशप यावेत आणि यांना धर्मात कोणतेही स्थान असू नये, असे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषण