शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

रासायनिक कंटेनर डेपोतील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, ४५० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:29 IST

Bangladesh : चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ही आग लागली.

ढाका : बांगलादेशात दक्षिण- पूर्व भागात एका खासगी रासायनिक कंटेनर डेपोत शनिवारी रात्री स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान ४३ लोकांचा मृत्यू झाला, तर ४५०पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे, आग लागल्यानंतर बचाव करायला गेलेलेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

चटगावच्या सीताकुंडमधील कदमरासूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री ही आग लागली. सरकारी अधिकारी शहादत हुसैन यांनी सांगितले की, शवागृहात आतापर्यंत ४३ मृतदेह आणण्यात आले आहेत. या घटनेत ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील किमान ३५० लोक चटगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५६० डॉलर (५०,००० टका) आणि जखमींना २२४ डॉलर (२०,००० टका) मदत दिली जाणार आहे.  एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, डेपोमध्ये आग लागली तेव्हा हा रिकामा होता. (वृत्तसंस्था)

नेमके काय झाले...पोलीस उपनिरीक्षक नुरुल आलम यांनी सांगितले की, कंटेनर डेपोत शनिवारी रात्री ९ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा या ठिकाणी स्फोट झाला आणि आग पसरली. रसायनांमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. रात्री ११.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि कंटेनरमध्ये रसायने असल्याने आग एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये पसरली. या डेपोत कंटेनरमध्ये हाइड्रोजन पेराेक्साइडसारखे अनेक प्रकारचे रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले.

आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमनची १९ वाहने या स्फोटानंतर घटनास्थळाजवळील घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. चटगाव अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा विभागाचे सहायक संचालक मोहम्मद फारुक हुसैन सिकंदर यांनी सांगितले की, अग्निशमनची जवळपास १९ वाहने आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत होती. तसेच, ६ ॲम्ब्युलन्सही घटनास्थळी हजर होत्या. अग्निशमन सेवेचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल मोहम्मद मैनुद्दीन यांनी सीताकुंड भागात घटनास्थळी पत्रकारांना सांगितले की, या डेपोत कंटेनरमध्ये हाइड्रोजन पॅराक्साइडसारखे अनेक प्रकारचे रसायने ठेवली होती आणि या रसायनांमुळेच आगीने भीषण रुप धारण केले. बहुतांश जखमी लोकांना सीएमसीएचमध्ये भरती करण्यात आले आहे. अग्निशमनचे कर्मचारी आणि अन्य अनेक जखमींवर एका सैन्य हॉस्पिटलध्ये उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश