शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 05:39 IST

Artemis II: तब्बल ५४ वर्षांनंतर ‘चंद्रा’च्या भेटीसाठी ‘आर्टेमिस-२’ यानाने दहा दिवसांपूर्वी रवाना झालेले चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३७ वाजता अमेरिकेत पॅसिफिक महासागरात सॅन दिएगो किनारपट्टीलगत ओरियन कॅप्सूलचे स्प्लॅशडाऊन झाले. 

वॉशिंग्टन -  तब्बल ५४ वर्षांनंतर ‘चंद्रा’च्या भेटीसाठी ‘आर्टेमिस-२’ यानाने दहा दिवसांपूर्वी रवाना झालेले चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३७ वाजता अमेरिकेत पॅसिफिक महासागरात सॅन दिएगो किनारपट्टीलगत ओरियन कॅप्सूलचे स्प्लॅशडाऊन झाले. 

२० जुलै १९६९ रोजी अपोलो-११ मोहिमेत नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर १९७२ मध्ये अपोलो-१७ पर्यंत विविध चांद्रमोहिमा सुरू होत्या. आता ५४ वर्षांनंतर आर्टेमिस-२ मोहिमेत चार अंतराळवीरांच्या रूपाने मानव पुन्हा चंद्रापर्यंत जाऊन आला. या मोहिमेच्या यशाबद्दल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

सर्व अंतराळवीर तंदुरुस्तदहा दिवसांत ३९ हजार ६९२ कि. मी. ताशी कमाल वेगाने अवकाशात एकूण ११ लाख २६ हजार कि. मी. एवढे प्रचंड अंतर पार करून कमांडर रीड वाईझमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅनसेन यांना घेऊन कॅप्सूल शनिवारी पहाटे पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरली. हे चारही अंतराळवीर तंदुरुस्त आहेत.

लँडिंग न करता यू-टर्न : आर्टेमिस-२ यानाने चंद्रावर लँडिंग न करता पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या अंधारमय अशा मागील भागापर्यंत मजल मारली आणि काही अंतर पार करून यू-टर्न घेत परतीचा प्रवास सुरू केला. होय... मार्ग उघडला : क्षत्रिय :नासा’त कार्यरत भारतीय वंशाचे सहायक प्रशासक अमित क्षत्रिय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की चंद्रापर्यंत पोहचण्याचा मार्ग आता उघडला आहे. परंतु, पुढील काम यापेक्षा अधिक जोखीमीचे आहे. 

... ती सहा मिनिटेचार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीकडे झेपावलेले कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तप्त लाल प्लाझ्माने घेरले गेले व ६ मिनिटे कंट्रोल रूमशी अंतराळवीरांचा संपर्क तुटला तेव्हा नियंत्रण कक्षात सर्वांच्या हृदयाचे ठोके काही क्षण चुकले. मात्र, कॅप्सूलभोवती असलेले जीवनरक्षक कवच कामी आले आणि पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. ...अन् कॅप्सूल लँड झालीहजारो कि. मी. ताशी वेगाने उतरणारे कॅप्सूल समुद्रात किनारपट्टीपासून सुमारे ३२०० कि. मी. आत सुरक्षित उतरले तेव्हा  अमेरिकी नागरिक तसेच नासाच्या नियंत्रण कक्षातील सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Astronauts Return Safely After Moon Mission: A 54-Year Feat

Web Summary : After 54 years, astronauts on the Artemis-2 mission safely returned to Earth, splashing down in the Pacific. The mission orbited the moon without landing, paving the way for future lunar endeavors. Despite a tense communication blackout during atmospheric entry, the crew landed safely and are in good health.
टॅग्स :NASAनासाMoonचंद्रUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय