शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Vaccine: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरास परवानगी; ब्रिटन सरकारचा मोठा निर्णय

By कुणाल गवाणकर | Updated: December 30, 2020 13:55 IST

CoronaVirus Vaccine: ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती

लंडन/नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं जगाची चिंता वाढली आहे. नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक वेगानं पसरत असल्यानं सर्वच देशांनी सावध पवित्रा घेतला आहे. भारतासह युरोपमधील जवळपास सर्वच देशांनी ब्रिटनसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक रोखली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटन सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील नियामक संस्था मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं (एमएचआरए) ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. आता ब्रिटननं ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीच्या वापरास परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील लसीच्या वापरास मंजुरी देऊ शकतं.कोरोनावरील लसीच्या डोजेसचं वितरण सुरू झालं आहे. यामुळे नव्या वर्षाला सुरुवात होताच लसीकरणास प्रारंभ करता येईल, अशी माहिती ऍस्ट्रा झेनेकानं मंजुरीनंतर दिली. पहिल्या तीन महिन्यांत ब्रिटन सरकारला लसींचे १०० मिलियन डोड पुरवण्याचं लक्ष्य कंपनीनं ठेवलं आहे. 'आजचा दिवस ब्रिटनच्या लाखो नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांना लवकरच लस दिली जाईल. या महत्त्वाच्या दिवशी आम्ही ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटन सरकार आणि लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवकांचे आभार मानतो,' असं ऍस्ट्रा झेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियट यांनी दिली. मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी दिल्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट केलं. 'ही अतिशय सकारात्मक बातमी आहे. हा ब्रिटिश विज्ञानाचा विजय आहे. ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला मंजुरी मिळाली आहे,' असं जॉन्सन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या