शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

AstraZeneca Corona Vaccine: अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे रक्तामध्ये गाठी? सहा देशांनी वापर थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 12:34 IST

AstraZeneca Corona Vaccination in Europe: डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे.

कोपेनहेगन : कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अ‍ॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर (AstraZeneca Corona Vaccination ) करत आहेत. मात्र, या कंपनीची लस वादात सापडण्याची शक्यता आहे. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी (blood clots) तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे. (Denmark, Norway, Iceland Suspend Use Of AstraZeneca Covid Vaccine)

डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस घेतल्यानंतर अशा प्रकारची हालत होत असल्याचे स्पष्ट झालेले नाहीय, असे म्हटले आहे. 

डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सांगितले की,  हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. याआधी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे. या नर्सचा मृत्यू तिच्या रक्तात गाठी तयार झाल्याने झाला होता. 

17 हून अधिक देशांना पुरवठाचार आणखी युरोपिय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. 17 युरोपीय देशांपैकी 10 देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे. डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरुपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक म्हणजे अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस ही पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटदेखील बनविते. भारतातही लस घेतल्यानंतर जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, भारत सरकारने या लोकांचा मृत्यू लसीमुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. या मृत लोकांना आधीपासूनच दुर्धर आजार होते, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या