काबूल : अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री अश्रफ घनी यांची रविवारी निवड जाहीर करण्यात आली. आपले याच पदासाठीचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याशी घनी यांनी सत्तावाटपाच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर निवडणुकीच्या निकालाबद्दल निर्माण झालेला वाद संपुष्टात आला आहे. गेल्या १४ जून रोजी झालेल्या निवडणुकीत घनी व अब्दुल्ला यांनी मीच विजयी झालो असा दावा केला होता. पर्यायाने देशाचे प्रशासन जणू अपंग बनले होते. युनिटी गव्हर्नमेंट करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर घनी व अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अध्यक्षीय प्रासादात झालेला हा समारंभ फक्त १० मिनिटे चालला. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आता अब्दुल्ला अब्दुल्ला हे स्वत:च्या पसंतीचा उमेदवार निवडू शकतील. हा मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधानपदाच्या बरोबरीचा असेल. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदी अश्रफ घनी
By admin | Updated: September 22, 2014 03:24 IST