शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला निर्णय, पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:58 IST

दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी बायडेन यांच्या कार्यकाळातील निर्वासित कार्यक्रम रद्द केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष होताच बायडेन यांच्या कार्यकाळातील रिफ्युजी प्रोग्रॅम रद्द केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, पाकिस्तानात अडकलेल्या अफगाण निर्वासितांना अमेरिकेत स्थायिक केले जाणार होते. बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला सांगितले होते की, अमेरिका थोड्याच वेळात सर्व निर्वासितांना आश्रय देईल, पण ते सत्तेत असताना हे होऊ शकले नाही. जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानातील सरकार उलथवून तेथे आपले राज्य घोषित केले तेव्हा हे सर्व निर्वासित अफगाणिस्तानातून पाकिस्तानात पळून गेले होते.

"अमित शाह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष", काँग्रेस ज्येष्ठ नेत्याची जीभ घसरली

अफगाणिस्तानातून पळून जाणाऱ्या बहुतेक निर्वासितांनी पूर्वी अमेरिकन सैन्यात काम केले होते. त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तान सरकारला सांगितले होते की, या निर्वासितांना काही काळ त्यांच्या देशात जागा द्यावी आणि त्यानंतर अमेरिका त्यांना कुठेतरी स्थायिक करेल. पाकिस्तानला आशा होती की ही प्रक्रिया काही महिन्यांत पूर्ण होईल पण तसे झाले नाही.

या २५,००० अफगाण निर्वासितांना अमेरिका कधी सोडवेल याची पाकिस्तान वाट पाहत राहिला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच सर्व काही उलथवून टाकले. अशा परिस्थितीत, जर पाकिस्तानने या प्रकरणात अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली, तर ट्रम्प यांचा कार्यकाळ सुरू होताच दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.

तालिबान राजवटीत लोकांच्या अडचणी वाढणार

अमेरिकन सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे १,६०० अफगाण निर्वासितांना अमेरिकेने स्थायिक होण्यास हिरवा कंदील दिला आहे. सध्या अमेरिकन सैन्यात सेवा करणाऱ्या अनेक अफगाणिस्तानी लोकांचे कुटुंब देखील या लोकांमध्ये आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर त्यांना त्यांचे विमान तिकीट रद्द करावे लागले. हे लोक आता घाबरले आहेत कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अमेरिका समर्थित अफगाणिस्तान सरकारसाठी काम केले आहे. आता तालिबान राजवटीत हे लोक मोठ्या धोक्यात येऊ शकतात.

आतापर्यंत या प्रकरणात पाकिस्तान सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही किंवा अमेरिकेनेही काहीही सांगितले नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प