शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

पुढच्या ४ वर्षात तब्बल ४० लाख मृत्यूंची शक्यता! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे वाढू शकतो एड्सचा प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:53 IST

एड्स (AIDS) विरुद्धच्या लढाईत जग जेव्हा नव्या औषधांमुळे विजयाच्या अगदी जवळ पोहोचले होते, तेव्हा अमेरिकेने घेतलेल्या एका अचानक निर्णयाने साऱ्या आशांना मोठा धक्का दिला आहे.

एड्स (AIDS) विरुद्धच्या लढाईत जग जेव्हा नव्या औषधांमुळे विजयाच्या अगदी जवळ पोहोचले होते, तेव्हा अमेरिकेने घेतलेल्या एका अचानक निर्णयाने साऱ्या आशांना मोठा धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर, अमेरिकेने एचआयव्ही (HIV) कार्यक्रमांसाठी दिली जाणारी आंतरराष्ट्रीय मदत थांबवली आहे.

संयुक्त राष्ट्रांची संस्था UNAIDSने याबद्दल गंभीर इशारा दिला आहे. जर अमेरिकेने बंद केलेल्या या फंडिंगची भरपाई झाली नाही, तर २०२९ पर्यंत म्हणजेच पुढील ४ वर्षांत ४० लाख लोकांचा जीव जाऊ शकतो आणि ६० लाखांहून अधिक नवीन संसर्गाची प्रकरणे समोर येऊ शकतात. अमेरिकेचा हा कार्यक्रम एचआयव्ही-एड्सच्या लढाईत अतिशय महत्त्वाचा होता.

२० वर्षांची योजना, जी अचानक तुटली!२००३ मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी PEPFAR प्रोग्राम (President’s Emergency Plan for AIDS Relief) सुरू केला होता. हा एचआयव्ही विरुद्ध जगातील सर्वात मोठा परदेशी मदत कार्यक्रम होता. या कार्यक्रमामुळे आतापर्यंत ८ कोटींहून अधिक लोकांची तपासणी झाली आणि २ कोटींहून अधिक लोकांना मोफत उपचार मिळाले. एकट्या नायजेरियामध्ये, एचआयव्हीच्या औषधांसाठी ९९.९% बजेट PEPFARमधूनच पूर्ण होत होते.

परंतु, जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेने ही परदेशी मदत अचानक थांबवली. यामुळे अनेक क्लिनिक बंद पडले, औषधांची पुरवठा साखळी थांबली आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या.

एका निर्णयाने आरोग्य व्यवस्थेवर संकटUNAIDS च्या अहवालानुसार, या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये एचआयव्ही विरोधात सुरू असलेले कार्यक्रम थांबले आहेत. तपासणीचा वेग मंदावला आहे, जनजागृती मोहिमांवर ब्रेक लागला आहे आणि अनेक समुदाय-आधारित संस्था पूर्णपणे बंद झाल्या आहेत. यामुळे केवळ रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे असे नाही, तर WHO आणि इतर एजन्सींनाही आता पुन्हा संपूर्ण व्यवस्था उभी करावी लागणार आहे.

अमेरिका केवळ औषधे आणि सुविधांसाठी पैसे देत नव्हता, तर आफ्रिकन देशांमध्ये एचआयव्ही संबंधित डेटा गोळा करण्यातही त्यांची सर्वात मोठी भूमिका होती. आता हे फंड बंद झाल्यामुळे रुग्णालये आणि सरकारी एजन्सीकडे रुग्णांचा डेटा नाही, तसेच पुढील रणनीती बनवण्याचे साधनही नाही.

नवीन औषधांची आशा, पण किंमत अडचण ठरतेयया दरम्यान, येझ् टुगो (Yeztugo) नावाच्या एका नवीन एचआयव्ही-विरोधी औषधाने आशा निर्माण केली आहे. हे औषध दर ६ महिन्यांनी एकदा घेतल्याने संक्रमण रोखण्यात १००% प्रभावी ठरले आहे. अमेरिकेच्या एफडीएने (FDA) देखील याला मंजुरी दिली आहे आणि दक्षिण आफ्रिकेने ते लागू करण्याची योजना आखली आहे.

मात्र, अडचण अशी आहे की, हे औषध बनवणाऱ्या गिलीड (Gilead) कंपनीने गरीब देशांसाठी ते स्वस्त दरात देण्याचे म्हटले आहे, पण लॅटिन अमेरिकासारख्या मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांना या यादीतून वगळले आहे. याचा अर्थ, जिथे एचआयव्हीचा धोका वाढत आहे, तिथे हे औषध पोहोचू शकणार नाही.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका