शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Artem Severiukhin: विजयानंतर खेळाडूने केला हिटलरच्या काळातील 'नाझी सलाम', संघाने केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:24 IST

Artem Severiukhin: रशियन खेळाडूवर शर्यत जिंकल्यानंतर अडॉल्फ हिटलरच्या काळातील 'नाझी सलाम' केल्याचा आरोप आहे.

क्रुर तानाशाह अडॉल्फ हिटलरच्या काळातील "नाझी सलाम" करणाऱ्या एका खेळाडुची संघातून हकालपट्टी केल्याची घटना घडली आहे. रशियन गो-कार्टर रेसर आर्टेम सेवेरिउखिनला(Artem Severiukhin) संघ व्यवस्थापनाने संघातून काढून टाकले. पोर्तुगालमध्ये रविवारी सीआयके-एफआयए युरोपियन कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आर्टेमने व्यासपीठावर "नाझी सलामी" दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

इटलीच्या ध्वजाखाली घेतला होता भाग कठोर युद्धविरोधी नियमांमुळे रशियन ड्रायव्हर्स त्यांच्या देशाच्या ध्वजाऐवजी इटलीच्या ध्वजाखाली खेळत आहेत. या शर्यतीत रशियाचे राष्ट्रगीतही वाजवले गेले नाही. परिणामी, सेवेरिउखिननेही इटालियन ध्वजाखाली शर्यतीत भाग घेतला होता. या शर्यतीत आर्टेम विजयी झाला. विजयोत्सवादरम्यान त्याने अडॉल्फ हिटलरच्या काळातील नाझी सलाम केला. यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

सेवेरिउखिनने नेमके काय केले?विजयानंतर व्यासपीठावर सेवेरिउखिनने त्याच्या छातीवर थाप मारली आणि उजवा हात धरला. असाच हावभाव अॅडॉल्फ हिटलर आणि इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा होता. परंतू, सेवेरिउखिनने नाझींना सलामी दिली नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, त्याने त्याचे मित्र आणि कुटुंबाकडे पाहून असा हावभाव केला आहे.

त्या कृत्याची चौकशीफेडरेशनने एफआयए कार्टिंग युरोपियनने आर्टेम सेवेरिउखिनच्या अस्वीकार्य वर्तनाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे खेळाडूवर कायमची बंदी घातली जाऊ शकते. एफआयएच्या निवेदनात म्हटले की, याप्रकरणी उचलल्या जाणार्‍या पावलांबाबत लवकरच माहिती देईल. 

टॅग्स :russiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय