शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बायडन यांच्या शपथविधीसाठी वॉशिंग्टनमध्ये बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 02:04 IST

गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला केला होता. आताही बायडेन यांचा शपथविधी सोहळा अवघ्या आठवडाभरावर आला असताना या सोहळ्यात ट्रम्प समर्थक विघ्न आणणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे

वॉशिंग्टन : मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात संसदेवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बायडेन यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी होणार आहे.

गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला केला होता. आताही बायडेन यांचा शपथविधी सोहळा अवघ्या आठवडाभरावर आला असताना या सोहळ्यात ट्रम्प समर्थक विघ्न आणणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वॉशिंग्टनमध्ये आतापासूनच कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. व्हाइट हाउसपासून नजीकच असलेल्या कॅपिटॉल परिसरात मोठमोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत तसेच व्हाइट हाउस परिसर सील करण्यात आला. शपथविधीच्या दिवशी ट्रम्प समर्थक ५० राज्यांत निदर्शने करणार असल्याची माहिती एफबीआयच्या हाती लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बाऊझर यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्यासाठी कोणीही कोलंबिया जिल्ह्यात येऊ नये, असेही आवाहन लोकांना करण्यात आले असल्याचे महापौरबाईंनी स्पष्ट केले. 

दुकाने, शॉपिंग मॉल्स आठवडाभरासाठी बंद शहरातील गर्दीची ठिकाणे, उपाहारगृहे, दुकाने, शॉपिंग मॉल्स आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आले असल्याचेही बाऊझर यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्यात आम्हाला कोणताही अनुचित प्रकार नको असून, त्यासाठी ही सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे. अध्यक्षांचा शपथविधी सोहळा साधेपणाने होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन