शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विशेष केशरचनेसाठी ‘ऑस्कर’कडून आर्नोल्डचा गौरव; शाळेतही केस राखण्याचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 23:23 IST

हक्कासाठी उभे राहिल्याबाबत अकादमीकडून कौतुक

त्याच्या डोक्यावर वर्षानुवर्षे करकचून बांधलेल्या केसांच्या बटा आहेत. नेहमीच आपल्या आवडत्या पद्धतीने केस बांधून, शाळेचा गणवेश परिधान करण्याचा नियम पाळूनच तो हजर राहत असे. त्याचे केस खांद्यावर, डोळ्यांच्या वर आणि डोळ्यांवर येणार नाहीत, असे असतात.माझे केस माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहेत. माझे वडील त्रिनिदादचे आहेत. अशा प्रकारची केशरचना आमच्या संस्कृतीचा भाग आहे. माझी इच्छा आहे की, शाळा अन्य संस्कृतींसाठीही खुली असावी. आम्हाला काही गोष्टी सांगण्याचा अधिकार असला पाहिजे. आमची मुस्काटदाबी होऊ नये, असे अर्नोल्ड याचे म्हणणे आहे.

डीगनेरेस या संस्थेने अर्नोल्डला नुकतेच एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी बोलाविले होते. त्याने स्वत:च्या हक्कांसाठी उभे राहून महत्त्वाच्या विषयाबद्दल जागरूकता निर्माण केली. त्याबद्दल या १८ वर्षांच्या मुलास कॉलेज शिक्षणासाठी २०,००० डॉलर्सची शिष्यवृत्ती देण्यात आली. आता या मुलास अकादमी पुरस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. ‘हेअर लव्ह’ या शॉर्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या चमूला पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. अभिनेता गॅब्रिएल युनियनसोबत हेअर लव्हची निर्मिती ड्वेन वेड यांनी केली आहे. त्यांनी अर्नोल्डला एक व्हिडीओ संदेश पाठवून सांगितले की, तू ज्या प्रकारे वागलास, ते आम्हाला आवडले. आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करायचे होते.

२०२० अकादमी पुरस्कारांमध्ये तू आणि तुझी आई सँडी हे हेअर लव्हच्या आॅस्कर - नामांकन असलेल्या संघाचे अधिकृत अतिथी आहात. आम्ही सर्वजण आपल्या कथेतून प्रेरित झालो आहोत. स्वत:च्या हक्कांसाठी उभे राहिल्याबद्दल आणि शाळेतही नैसर्गिक केस राखण्याच्या आग्रही हक्काबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.

मुख्याध्यापकांनी दिली तंबीलांबलचक केस कापले पाहिजेत. तसे केले नाही, तर शाळेच्या पदवीदान समारंभात भाग घेऊ शकणार नाही, अशी तंबी मुख्याध्यापकाने एका किशोरवयीन मुलाला दिली होती. डीएन्ड्रे आर्नोल्ड असे त्याचे नाव. याचकिशोरवयीन मुलास हक्कांसाठीच्या संघर्षाबद्दल नुकतेच ऑस्कर सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.