शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bangladesh Crisis : बांगलादेशात आता जमावाचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 11:25 IST

Bangladesh Crisis : सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही.

Bangladesh Crisis : ढाका : बांगलादेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांग्लादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. 

सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. दरम्यान, आता लष्कराच्या जवानांवरही हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. गोपालगंज भागात लष्कराच्या वाहनावर जमावानं हल्ला केला आहे. 

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

रिपोर्टनुसार, अवामी लीगचे हजारो नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी आंदोलकांनी ढाका-खुलना महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान, लष्कराचे वाहन तेथे पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना रस्ता खुला करून आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं. मात्र जमावानं त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला.

प्रत्युत्तरात, आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली आणि गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी या घटनेची पुष्टी केली. जवळपास ३००० ते ४००० लोक जमले होते आणि त्यांनी रस्ता अडवला होता, असं मकसूदुर रहमान यांनी सांगितलं. तर गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. एका मुलासह दोन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.

दरम्यान, बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, आसाम पोलीस भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये. पोलीस महासंचालक जी.पी. सिंग म्हणाले की, बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय