शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

आॅनलाइन विक्री होणारी अ‍ॅपलची उत्पादने बनावट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 01:57 IST

अ‍ॅमेझॉनवरून अ‍ॅपलची उत्पादने खरेदी करणाऱ्यांना दक्षतेचा इशारा. अ‍ॅमेझॉन, ग्रुपॉन यांसारख्या आॅनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे अ‍ॅपलचे ९० टक्के चार्जर

सॅन फ्रॅन्सिस्को : अ‍ॅमेझॉनवरून अ‍ॅपलची उत्पादने खरेदी करणाऱ्यांना दक्षतेचा इशारा. अ‍ॅमेझॉन, ग्रुपॉन यांसारख्या आॅनलाइन विक्री करणाऱ्या साइट्सवर विकले जाणारे अ‍ॅपलचे ९० टक्के चार्जर, यूएसबी केबल, यूएसबी पॉवर अ‍ॅडॉप्टर ही उत्पादने बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अ‍ॅपलच्या नावे बनावट उत्पादनांची आॅनलाइन विक्री करणाऱ्या मोबाइल स्टार एलएलसीविरुद्ध अ‍ॅपलने न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. अ‍ॅपलने कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीविरुद्ध दीड लाख आणि ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी दोन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केला आहे. तसेच अ‍ॅपलच्या नावे खपवली जाणारी बनावट उत्पादने ही ज्वलनशील असून, त्यामुळे ग्राहकांसाठी ती धोकादायक असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. आयफोन तयार करणाऱ्या अ‍ॅपलची अ‍ॅमेझॉनवर विकली जाणारी दहापैकी नऊ उत्पादने ही बनावट असतात, असे अ‍ॅपलने ट्रेडमार्क उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले. (वृत्तसंस्था)कंपन्यांचे काय दावे?अ‍ॅपलने अ‍ॅमेझॉनवरून पॉवर प्रोडक्ट खरेदी केले होते. पडताळणी केली असता हे प्रोडक्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अ‍ॅपलने याबाबतची माहिती अ‍ँमेझॉनला दिली. खरेदी करण्यात आलेले हे बनावट पॉवर प्रोडक्ट मोबाइल स्टार कंपनीने तयार केले होते, असा दावा या खटल्यात अ‍ॅपलकडून करण्यात आला आहे. मात्र अ‍ॅमेझॉनने आम्ही बनावट उत्पादनांना थारा देत नाही. उत्पादनांचा खरेपणा काटेकोरपणे तपासूनच ती विक्रीसाठी ठेवली जातात असा दावा केला आहे.