शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन्वर उल हक पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान; शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 19:35 IST

अन्वर उल हक काकर यांची गणना देशातील प्रसिद्ध विचारवंतांमध्ये केली जाते.

पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय गदारोळात अन्वर उल हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. शाहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी अन्वर-उल-हक काकर यांच्या नावावर सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे. अनवर-उल-हक काकर शनिवारीच शपथ घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे. 

बलुचिस्तानचे खासदार अन्वर उल हक काकर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे, असेही पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अन्वर उल हक काकर हे बलुचिस्तानचे खासदार आहेत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 ऑगस्ट रोजी संसद विसर्जित झाल्यामुळे शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला. पाकिस्तानी घटनेनुसार, सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान काळजीवाहू पंतप्रधान निवडण्याची अंतिम तारीख शनिवारीच होती. त्यामुळे शाहबाज शरीफ यांनी आपले विश्वासू अनवर उल हक काकर यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केल्याचे सांगण्यात येते.

अलीकडेच पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून लवकरात लवकर नवीन काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्याची विनंती केली होती. शाहबाज शरीफ यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रपती अल्वी यांनी लिहिले की, पाकिस्तानच्या घटनेच्या कलम 224 मध्ये पंतप्रधान आणि बाहेर जाणार्‍या नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते 12 ऑगस्टपूर्वी काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीसाठी प्रस्ताव देऊ शकतात. राष्ट्रपतींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाहबाज शरीफ यांनी नाराजी दर्शवली होती आणि पत्रामुळे आपण निराश झाल्याचे सांगितले.

अन्वर उल हक काकर यांचा राजकीय प्रवासपाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, अन्वर उल हक काकर 2018 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते आणि ते खूप सक्रिय राजकारणी आहेत. वरिष्ठ सभागृहात निवडून येण्यापूर्वी त्यांनी प्रांतीय सरकारचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. तसेच, अन्वर उल हक काकर यांची गणना देशातील प्रसिद्ध विचारवंतांमध्ये केली जाते. ते बलुचांच्या पश्तूनांशी संबंधित काकर जमातीचे आहेत. त्यामुळे ते पश्तून आणि बलूच या दोघांचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान, अन्वर उल हक काकर यांचे पीएमएल-एन आणि पीपीपीसह मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांशीही चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. तसेच, त्यांनी बलुचिस्तान विद्यापीठातून शिक्षण घेतले असून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकprime ministerपंतप्रधान