शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

संपूर्ण युरोपात दहशतवादविरोधी शोध मोहिम

By admin | Updated: January 17, 2015 07:08 IST

बॉम्ब असल्याच्या अफवेने पॅरिसमधील गारे डी १ हे रेल्वेस्थानक बंद करून रिकामे करण्यात आले असून, या भागात दहशतवादविरोधी कारवाईत १० संशयितांना अटक

पॅरिस : बॉम्ब असल्याच्या अफवेने पॅरिसमधील गारे डी १ हे रेल्वेस्थानक बंद करून रिकामे करण्यात आले असून, या भागात दहशतवादविरोधी कारवाईत १० संशयितांना अटक करण्यात आली आहे. पूर्वकाळजी म्हणून हे रेल्वेस्थानक बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गारे डी हे पॅरिसमधील एक गर्दीचे रेल्वेस्थानक असून, पूर्वेकडील शहरांना ते जोडलेले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे पॅरिसमधील हल्यानंतर पॅरिस भेटीवर आले असून त्यांच्या दौऱ्यादरम्यान या घटना घडल्या आहेत. दरम्यान, जर्मनीत बर्लिन शहरात आज दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, ते इस्लामिक स्टेटसाठी जिहादींची भरती करीत असल्याचा आरोप आहे. दोन दहशतवादी ठार दरम्यान, बेल्जियममधील पोलिसांनी दहशतवादी चकमकीत गोळीबार केला यात दोन संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. ब्रुसेल्सपासून ७५ मैलावर असणाऱ्या वर्वियर्स येथे ही चकमक झाली. येथील रेल्वेस्थानकात पोलीस दहशतवाद्यांच्या जवळ गेले असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांत दोन दहशतवादी ठार झाले व तिसरा जखमी झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या चकमकीनंतर देशातील अलर्टची पातळी वाढविण्यात आली आहे. युरोपवर सावट पॅरिस येथील चार्ली हेब्डो साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा बळी गेल्यानंतर दहशतवादी घटनांची मालिका सुरू झाली असून संपूर्ण युरोपभर त्याचे सावट पसरलेले आहे. युरोपमधील सर्वच देशातील युवक इस्लामिक स्टेटच्या लढाईत सहभागी होण्यासाठी गेले असून, त्यांच्यापैकी काहीजण परतत आहेत. त्यांचीही धरपकड करण्यात येत असल्याने वातावरण स्फोटक बनले आहे. (वृत्तसंस्था)> या चकमकीची चित्रफीत वेबसाईटवर टाकण्यात आली असून त्यात अंधाऱ्या इमारतीत चाललेले स्फोट दिसत आहेत. > बेल्जियमच्या हल्लेखोराचा दावा > वर्वियर्स येथील चकमकीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून, त्याने पॅरिसमधील हल्लेखोर कौलीबली याच्या पत्नीकडून आपण कार खरेदी करणार होतो असे सांगितले आहे. सध्यातरी पॅरिसमधील दहशतवादाशी बेल्जियमच्या आरोपींचा हाच संबंध आहे.