शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

Bangladesh : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 10:23 IST

कट्टरतावादी लोकांना फंड पुरवण्यात पाकिस्तान मदत करत असल्याची माहिती

ठळक मुद्देकट्टरतावादी लोकांना फंड पुरवण्यात पाकिस्तान मदत करत असल्याची माहितीया हिसाचारात हत्जारी, चटगांव आणि ब्राह्मणबारियाला फटका बसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर त्या ठिकाणी होत असलेल्या हिंसक आंदोलनाच्या मागे आता पाकिस्तानी अँगल असल्याचं समोर येत आहे. इंडिया टुडेला वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तान कट्टरतावादी लोकांना फंड देण्यासोबतच त्यांची शक्य ती मदत करत आहे. बांगलादेशला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले होते. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे. जमात आणि बीएनपीची लोकं हे हिंसक आंदोलन करत आहेत आणि यामागे पाकिस्तानचा हात असल्याचंही समोर येत आहे असं सूत्रांनी सांगितलं. याबाबत बांगलादेशच्या संसदेनंही ट्वीट  केलं होतं. यात कट्टरतावादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम आणि पाकिस्तान उच्चायोगामध्ये संबंध असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर बांगलादेशात हिफाजत-ए-इस्लाम अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करत आहे. "पाकिस्तानी उच्चायोग ढाका, हिफाजत-ए-इस्लामला फंड देत आहे, जेणेकरून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन केलं जाऊ शकेल. आम्ही धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही असलेलो देश आहोत. आम्ही या कृत्याचा निषेध करतो," असं बांगलादेशच्या संसदेनं म्हटलं आहे. परंतु नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. यानंतर बांगलादेश संसदेनं आपल्या नव्या ट्वीटमध्ये म्हटलं की "पाकिस्तानचं कृत्य नींदनीय आगे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की बांगलादेश जमात-ए-इस्लामीवर निर्बंध घातल्यानंतर आता हिफाजत-ए-इस्लाम या नावानं त्याचं संचालन केलं जात आहे. हा पक्षा देशात शरीया कायदा लागू करू इच्छित आहे."पाकिस्तानचाच हातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा कव्हर करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोदींच्या विराधात होत असलेल्या या आंदोलनाच्या मागे पाकिस्तानचा हात आहे. हिसाचार हा ब्राह्मणबारियाच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात झाला. याव्यतिरिक्त ढाक्यातील एका मशिदीतही हिंसाचार झाला. या हिसाचारात हत्जारी, चटगांव आणि ब्राह्मणबारियाला फटका बसला होता. या हिंसाचारावर स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र बॅरिस्टर शेख फजल नूर तपोश यांनीदेखील माहिली दिली. "बांगलादेशात इस्लामी कट्टरतावाद्यांद्वारे करण्यात आलेल्या हिंसाचाराला दहशतवादी संघटना जमात-ए-इस्लामीचं समर्थन मिळालं आहे. याचा यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध होता," असं ते म्हणाले. 

जमात-ए-इस्लामी पाकिस्तान समर्थक पक्षजमात-ए-इस्लामी हा पाकिस्तान समर्थक पक्ष आहे. हा पक्ष कायमच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होता. सध्या त्यांच्यावर निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु जमात विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्च पार्टीच्या प्रमुख सहकारी पक्षांपैकी एक आहे. "हिफाजतचं वर्तमान नेतृत्व भारत विरोधी आहे आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आहे. परंतु हिफाजतचा मोदी यांच्या दौऱ्याच्या विरोधातील कोणताही कार्यक्रम नव्हता. परंतु मोदी हे ढाक्यात आल्यानंतर काही लोकांनी बैतुल मुकर्रम मशिदीसमोर हिंसक आंदोलन सुरू केलं. हे वृत्त संपूर्ण देशात पसरलं आणि त्यानंतर हिफाजतही यात सामील झालं," असं ज्येष्ठ पत्रकार मसूल करीम यांनी सांगितलं. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानParliamentसंसदprime ministerपंतप्रधान