शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक हादरा! ...म्हणून चीन मधून बिऱ्हाड गुंडाळतायत परदेशी कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 23:14 IST

आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे.

कोरोनापूर्वी जगाची फॅक्ट्री म्हणून ओळखला जाणारा चीन आज आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. चीनचीअर्थव्यवस्था पार डबघाईला आली आहे. आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करत असलेल्या चीनला, या संकटातून पुन्हा एकदा पटरीवर आणण्यात राष्ट्रपती शी जिनपिंग अपयशी ठरताना दिसत आहे. चीनला त्याची मुजोरी आता महाग पडत आहे. अमेरिकेची चीनबद्दलची कटुता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. आता जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एका गुंतवणूकदाराने चीनला हादरा दिला आहे.

महत्वाचे म्हणजे, परकीय गुंतवणूकदारांनी आपली चीनमधील गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात केली आहे. एवढेच नाही, तर जगातील अनेक देशांनी चीनला चीनला बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. 

चीनमधून आपला कारभार गुंडाळतेय कंपनी -जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक, सॉवरेन वेल्थ फंड ऑपरेट करणाऱ्या नॉर्गेस बँक इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्टने (NBIM) चीनमधील आपला कारभार गुंडाळण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर एमबीआयएमने या वर्षाच्या अखेरपर्यंत चीनमधील आपले कार्यालय बंद करन्याचीही घोषणा केली आहे. चीनमधील जवळपास 805 कंपन्यांमध्ये हिची तब्बल 42 अब्ज डॉलरची हिस्सेदारी आहे, यावरूनच हा चीनला केवढा मोठा धक्का आहे, याचा अंदाज येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, ही फर्म नॉर्वे सरकारचा 1.4 ट्रिलियन डॉलरचा पेंशन फंड देखील मॅनेज करते. जो स्टॉक मार्केटमध्ये जगातील सर्वात मोठा सिंगल गुंतवणूकदार आहे.

कंपन्या सोडतायत चीनची साथ -चीन सरकारची वर्तणूक आणि व्यवसायातील ढवळाढवळ, यामुळे कंपन्या आधीच चीनवर नाराज आहेत. तसेच चिनी अर्थव्यवस्थेत आलेल्या स्लोडाउनने कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नॉर्गेस बँक इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्टनेट नव्हे, तर जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधील आपला कारभार गुंडाळायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :chinaचीनEconomyअर्थव्यवस्थाAmericaअमेरिकाXi Jinpingशी जिनपिंग