शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आणखी एक धक्का; अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:54 IST

तहव्वुर राणा याची प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंड तहव्वुर राणा याला पुन्हा एक धक्का बसला आहे. भारतात प्रत्यार्पणाविरोधातील याचिका अमेरिकेच्या  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

तहव्वुर राणा याने या याचिकेत  पाकिस्तान वेशाचा असल्यामुळे तिथे छळले जाईल असा दावा केला होता.  भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी तो जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे, याचिकेत राणाने असा युक्तिवाद केला. यासाठी राणाने त्याच्या गंभीर आजारांसह अनेक घटकांचा उल्लेख केला. 

राणा याच्या याचिकेत असे नमूद केले होते की जर त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती दिली नाही तर कोणताही आढावा घेणे शक्य होणार नाही.

राणाने याचिकेच्या गुणवत्तेनुसार त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची आणि भारतात आत्मसमर्पण रोखण्यासाठी मागणी केली होती.

या याचिकेमध्ये राणा याचे भारतात प्रत्यार्पण करणे हे अमेरिकेच्या कायद्याचे आणि छळाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचेही उल्लंघन आहे, असं म्हटले होते.'जर याचिकाकर्त्याला भारतात प्रत्यार्पण केले तर त्याच्यावर अत्याचाराचा धोका आहे असे मानण्यासाठी पुरेसे कारण आहेत, असंही या याचिकेत म्हटले आहे.

६४ वर्षीय राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. त्याला सध्या लॉस एंजेलिसमधील एका तुरुंगवास केंद्रात ठेवण्यात आले आहे. २६/११ च्या हल्ल्यात राणावर त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप आहे. हेडलीला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते.त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व होते. त्याची आई अमेरिकन होती आणि वडील पाकिस्तानी होते. हेडली हा मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. त्याला ऑक्टोबर २००९ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

टॅग्स :Mumbaiमुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाCourtन्यायालय