शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या

By admin | Updated: March 4, 2017 14:57 IST

अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 4 - अमेरिकेतील कॅनसस शहरात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली घटना ताजी असतानाच भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली आहे. 43 वर्षीय हरनिश पटेल यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  हरनिश पटेल दक्षिण कॅरोलिनाच्या लँकस्टर शहरात राहत होते. गुरुवारी रात्री ही घटना घडली. हरनिश पटेल रात्री 11 वाजता दुकान बंद करुन घराकडे निघाले होते. त्यानंतर 10 मिनिटातच त्यांच्या घरापासून काही अंतरावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. 
 
(भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निषेध)
(श्रीनिवास कुचिभोतलांना कान्सासमध्ये श्रद्धांजली)
 
गुरुवारी रात्री एका महिलेने पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. महिलेने आपण ओरडण्याचा आणि गोळ्यांचा आवाज ऐकल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हरनिश मृतावस्थेत आढळले. पोलिसांना अद्यार आरोपींचा शोध लागला नसून तपास करत आहेत.
 
 
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हरनिश यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हरनिश यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा आहे. हरनिश यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेले लोक दुकानाबाहेर फुगे आणि फुलं सोडून जात आहेत. यामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची जास्त संख्या आहे. दुकानाच्या बाहेर एक पोस्टर लावण्यात आला असून काही आणीबाणीच्या परिस्थितीमुळे दुकान बंद ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 
 
दरम्यान, श्रीनिवास कुचीबोटला याची वर्णविद्वेषातून हत्या करण्यात आल्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना निषेध केला. नवीन स्थलांतर नियम हे केवळ देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत असे ते म्हणाले. आम्ही अशा हीन स्वरूपाच्या कृत्यांचा निषेध करतो असे सांगत त्यांनी ज्यू केंद्रांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व कन्सास गोळीबार घटनेचा उल्लेख केला. जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे संयुक्त अधिवेशनात हे पहिलेच भाषण होते.
 
22 फेब्रुवारी रोजी कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला (32) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली गोली. यावेळी आमच्या देशातून चालते व्हा ; अतिरेक्यांनो, असे हल्लेखोर म्हणत होता. माजी नेमबाज एडन पुरिनतोन (51) याने हा गोळीबार केला. त्याचा आणि या इंजिनीअरचा वर्णद्वेषावरुन वाद झाला होता. या हल्ल्यात अन्य एक भारतीय व त्यांचा सहकारी अलोक मदसानी हे गंभीर जखमी झाले आहेत.