शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:02 IST

ब्रिटनने संरक्षणावर आता भर दिला आहे, ब्रिटनने आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी १२ नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या हल्ला पाणबुड्या बांधण्याचे जाहीर केले.

गेल्या काही वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. आज युक्रेनमधील रशियन लष्करी विमानतळांवर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर, संपूर्ण जग रशियाच्या या हालचालीबद्दल घाबरले आहे. जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटत आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमकतेमुळे आणि युरोपमधील युद्धजन्य वातावरणामुळे, ब्रिटनने आपल्या लष्करी तादक वाढवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी सोमवारी 'स्ट्रॅटेजिक डिफेन्स रिव्ह्यू' प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी देश १२ अत्याधुनिक अणुऊर्जेवर चालणाऱ्या हल्ला पाणबुड्या बांधणार असल्याचे जाहीर केले. 

सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी

स्टार्मर यांनी आपल्या भाषणात रशियाचे थेट नाव घेत म्हटले की, "आपण युरोपमध्ये युद्ध पाहत आहोत, नवीन अणु आव्हाने दिसत आहेत, आपल्या समुद्री क्षेत्रात रशियन हालचाली वाढत आहेत. आपण या धोक्यांना फक्त उत्तर देणार नाहीतर त्यांच्या पुढेही जाणार."  या पाणबुड्या "रशियन आक्रमणाला थेट प्रतिसाद" आहेत आणि ब्रिटन मागे हटणार नाही हे दर्शवितात, हे त्यांनी स्पष्ट केले.

या SSN-AUKUS पाणबुड्या ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी AUKUS अंतर्गत बांधल्या जातील. या पाणबुड्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील आणि हजारो किलोमीटर अंतरावर मारा करण्यास सक्षम असतील. यामुळे रशियाच्या सागरी रणनीतीला आव्हान देण्याची शक्यता आहे.

नवीन संरक्षण धोरणांतर्गत, ब्रिटन एक "सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक कमांड" देखील तयार करेल जे रशियाच्या सायबर हालचालींना आणि हल्ल्यांना तोंड देईल. हे युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल आणि सायबर युद्धाच्या क्षेत्रात ब्रिटनची आक्रमक आणि बचावात्मक क्षमता वाढवेल.

संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ

२०२७ पर्यंत संरक्षण बजेट जीडीपीच्या २.५% आणि २०३४ पर्यंत ३% पर्यंत नेण्याचे वचन युकेने दिले. युके आता शांततेवर अवलंबून राहू इच्छित नाही हे स्पष्ट नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया