शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खोकल्याचे आणखी एक औषध विषारी; देशातील या सिरपचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 09:27 IST

भारताच्या आणखी एका सिरपने वाद

जिनिव्हा : भारतात उत्पादित झालेल्या आणखी एका खोकल्याच्या दूषित सिरपबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. ग्वायफेनेसिन सिरप असे त्या औषधाचे नाव असून, ते पंजाबमधील क्यूपी फार्माकेम लिमिटेड या कंपनीने तयार केले आहे. त्याची विक्री हरयाणातील ट्रिलियन फार्मामार्फत करण्यात येते. मार्शल बेटे व मायक्रोनेशिया येथे हे सिरप वितरीत केल्याचे आढळून आले.

ग्वायफेनेसिन सिरप घेतल्याने मार्शल बेटे किंवा मायक्रोनेशिया येथील मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही माहिती दिलेली नाही. या सिरपमध्ये डायथिलीन ग्यालकोल व इथिलिन ग्लायकोचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विषासारखा विपरीत परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील थेरप्युटिक गुड्स ॲडमिनिस्ट्रेशन या यंत्रणेने केलेल्या चाचणीत ग्वायफेनेसिन सिरप दूषित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

गेल्या वर्षी ३०० मृत्यूn गेल्या वर्षी भारत व इंडोनेशियाने बनविलेल्या दूषित सिरपबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला होता.n गांबिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान या देशांत दूषित सिरप घेतल्याने किडनी विकार जडून ३०० मुले मरण पावली होती. त्यातील बहुतांश मुले ५ वर्षे वयाखालील होती. n क्यूपी फार्माकेम तसेच ट्रिलियम फार्मा या कंपन्यांनी ग्वायफेनेसिन सिरपच्या गुणवत्तेबाबत आम्हाला हमी दिलेली नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

कंपनी म्हणते... : क्यूपी फार्माकेमचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक म्हणाले की, निर्यात केलेल्या ग्वायफेनेसिन सिरपच्या नमुन्याची पुन्हा चाचणी केली. ग्वायफेनेसिन सिरपच्या १८ हजार बाटल्या कंबोडियाला निर्यात करण्याची आम्हाला परवानगी मिळाली होती. मात्र, या सिरपचा साठा मार्शल बेट येथे कसा पोहोचला, याची कल्पना नाही.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाhospitalहॉस्पिटल