शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अन् अलार्म क्लॉकमुळे तो दहशतवादी हल्ल्यातून बचावला...

By admin | Updated: December 18, 2014 13:43 IST

अलार्म क्लॉक वेळेवर न वाजल्याने उठायला उशीर झाला आणि दाऊद शाळेत गेला नाही, मात्र त्याचमुळे तालिबान्यांच्या हल्ल्यातून त्याचा जीव वाचला.

ऑनलाइन लोकमत

पेशावर, दि. १८ - पेशावरमधील शाळेत तालिबान्यांनी घातलेल्या थैमानामुळे अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला मात्र अलार्म क्लॉक न वाजल्यामुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याची घटनाही येथेच घडली आहे.  लष्करी शाळेत नववीत शिकणारा १५ वर्षीय दाऊद इब्राहिम अलार्म क्लॉक न वाजल्यामुळे वेळेवर उठू शकला नाही आणि त्याला शाळेला दांडी मारावी लागली. मात्र त्याचमुळे तो सुदैवी ठरला. त्याच्या वर्गातील बहुसंख्य विद्यार्थी मारले गेले, मात्र शाळेत न गेल्याने दाऊदचा जीव मात्र वाचला.
दाऊद सोमवारी संध्याकाळी कुटुंबियांसह एका लग्नाला गेला होता. मात्र सकाळी त्याचा अलार्म वेळेवर न वाजल्याने त्याला उठायला उशीर झाला आणि त्याला शाळेत जाता आले नाही. मात्र थोड्याच वेळात त्याला दहशतवाद्यांनी शाळेवर केलेल्या हल्ल्याची बातमी कळली आणि शाळेत न गेल्याने जीवावरच्या किती मोठ्या संकटातून आपण वाचलो याची जाणीव त्याला झाली.
' दाऊद सध्या कोणाशीच बोलत नाहीये. त्याच्या वर्गातील एकही विद्यार्थी वाचू शकला नाही. त्याने आज त्याच्या सहका-यांना शेवटचा निरोप दिला. तेव्हापासूनच तो कोणाशीच तो बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये,' असे त्याच्या भावाने सांगितले. 
मंगळवारी तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्करी शाळेत घुसून थैमान घातले. शाळेच्या वर्गांमध्ये शिरून अतिरेक्यांनी आपल्याकडील रायफलींमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जे कोणी त्यांच्या गोळीबाराच्या पट्ट्यात आले त्यांची कलेवरे शाळेच्या आवारात इतस्तत: विखुरली गेली. या हल्ल्यात निष्पाप विद्यार्थ्यांसह १४१ जणांनी जीव गमावला आहे.