शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'...तर अमेरिकेतील मध्यमवर्ग जाईल गरिबीच्या खाईत, वांशिक भेदाचा सामना करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 15:42 IST

सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक हाहाकार घातला आहेअमेरिकेतील मध्यमवर्गाला कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेत गेल्या चार आठवड्यांत 2.2 कोटी लोकांनी सरकारकडे केलाय बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज

न्यू यॉर्क : कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक हाहाकार घातला आहे. जगाचा विचार करता, कोरोनाबाधितांची आणि कोरोनामुळे मरणारांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतच आहे. महासत्ता अमेरिका कोरोनापुढे हतबल झाल्यासारखी दिसत आहे. असे असतानाच आता, कोरोना व्हायरसमुळे कोट्यवधी मध्यमवर्गिय नागरिकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवायचे असेल, तर अमेरिकेला तत्काळ महत्वपूर्ण पावले उचलावी लागतील. असे झाले नाही, तर अमेरिकेच्या अनेक भागांना गरिबीचा सामाना करावा लागू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत फिलिप एल्स्टन यांनी दिला आहे.

अमेरिकेतील मध्यमवर्गाला कोरोनाचा सर्वाधिक फटका -एल्स्टन म्हणाले, ‘सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत.

घरभाडे देणेही अवघड -अमेरिकेत गेल्या चार आठवड्यांत 2.2 कोटी लोकांनी सरकारकडे  बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेतील काही अर्थतज्ज्ञांनी देशातील 4.7 कोटी लोकांची नोकरी जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेत भाड्याने राहत असलेल्या जवळपास एकतृतियांश लोकांना एप्रिल महिन्याचे भाडे वेळेवर देता आलेले नाही.

गरिबांना अधिक धोका -येथील गरीब लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. ते केवळ अशाच नोकऱ्या करू शकतात, जेथे आजारांच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिका आहे. ते गर्दीच्या ठिकाणी आणि अशा भागातच राहू शकतात, जेथे हवा प्रदूषण अधिक आहे. येथील वांशिक भेदभावाचा सामना करणाऱ्या समुदायाला कोरोनाचा अधिक धोका आहे. अशा नागरिकांचाच येथे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. असे असतानाही, अनेकांना सरकारी मदत पोहोचत नाहीये आणि एवढ्यामोठ्या संकटात ती अत्यंत तुटपुंजी आहे, असे एल्स्टन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प