शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Russia Syria Attack: युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच, रशियानं या देशावरही केला हवाई हल्ला, 120 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:16 IST

Syria Air Strike Update: सना या वृत्तसंस्थेने सीरियातील रशियातील सैन्य सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लढाऊ विमानांनी इदलिब प्रांतातील शेख यूसुफ भागात एक नुसरा फ्रंट ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात ऑब्झर्व्हेशन पॉइंट्स, ड्रोन आणि मिसाइल लान्चर्स नष्ट करण्यात आले आहेत.

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात अद्यापही युद्ध सुरूच आहे. असे असतानाच आता रशियाने मध्य-पूर्व आशियातील सीरियावरही (Syria) जबरदस्त हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 120 बंडखोर मारले गेल्याचे वृत्त आहे. वायव्य सीरियातील (North-Western Syria) अल-कायदाशी संबंधित (Al-Queda) नुसरा फ्रंटच्या (Al-Nusra Front) ठिकाणांवर रशियाच्या लढाऊ विमानांनी जबरदस्त बॉम्बिंग केली. या हवाई हल्ल्यांमुळे (Russian Air Strike) परिसरात एकच धावपळ उडाली. नुसरा फ्रंटची अनेक ठिकानं नष्ट झाली आहे.

सना या वृत्तसंस्थेने सीरियातील रशियातील सैन्य सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लढाऊ विमानांनी इदलिब प्रांतातील शेख यूसुफ भागात एक नुसरा फ्रंट ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात ऑब्झर्व्हेशन पॉइंट्स, ड्रोन आणि मिसाइल लान्चर्स नष्ट करण्यात आले आहेत.

रशियानंकेले 14 हवाई हमल्ले - ब्रिटेनमधील युद्ध मॉनिटर सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सनेही इदलिबमधील रशियन हल्ल्याचे वृत्त दिले आहे. यात, रशियन फायटर जेटने गुरुवारी 14 हवाई हल्ले केल्याचे आणि इदलिब प्रांतातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागावर क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे म्हणण्यात आले आहे.

इदलिब बनलाय बंडखोरांचा गड -विशेष म्हणजे, इदलिबवर नुसरा फ्रंट सारख्या कट्टरपंथी गटांसह अनेक बंडखोर गटांनी कब्जा केला आहे. इदलिब हा सीरियातील बंडखोरांचा शेवटचा मोठा गड म्हणून उदयास आला आहे. रशियाने कट्टरपंथीयांचा हा कब्जा हटविण्यासाठी हा हल्ला केला आहे.

टॅग्स :russiaरशियाwarयुद्धterroristदहशतवादी