शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 'या' देशात दररोज 2 लाखांहून अधिक प्रकरणे, तरीही पंतप्रधानांनी लॉकडाऊन लागू करण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:46 IST

Boris Johnson : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव सुद्धा वेगाने वाढत आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांमुळे येथील सरकारची झोप उडाली असेल, तरीही कठोर निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. मंगळवारी याठिकाणी दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होणारी वाढ पाहता, सरकार लॉकडाऊनसारख्या कठोर उपाययोजना करू शकते, असे म्हटले जात होते, परंतु पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी लॉकडाऊनला नकार दर्शविला आहे. सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव सुद्धा वेगाने वाढत आहे. ज्याप्रकारे प्रकरणे वाढत आहेत, ते पाहता तज्ज्ञ कठोर नियम लागू करण्याचा सल्ला देत आहेत, मात्र सरकार सध्या यासाठी तयार नाही. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सांगितले की, इंग्लंड आर्थिक घडामोडी बंद न करताही कोरोना संसर्ग अनियंत्रित होण्यापासून रोखू शकतो.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन उपायांच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लसीचा बूस्टर डोस आणि लोकांना सावधगिरी बाळगण्यासाठी जागरूक करणे, हे कोरोनाची नवीन लाट रोखण्यासाठी पुरेसे आहे. दरम्यान, यूकेमध्ये मंगळवारी 218,724 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली, जी एका दिवसात नोंदवलेल्या प्रकरणांपैकी सर्वाधिक संख्या आहे.

कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही, त्यामुळे सध्या सरकार लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांकडे पाहत नाही, असे ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी क्रिस व्हिट्टी म्हणाले.  तर पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 60 टक्के रुग्णांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून संसर्ग पसरण्याची शक्यता मर्यादित करता येईल. दुसरीकडे, इटलीमध्ये एकाच दिवसात 170,844  कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या