शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील ‘डाटा लोकेशन’ला अमेरिकेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 02:22 IST

अंमलबजावणी उंबरठ्यावर : सीमांची बंधने तोडून माहितीचे आदान-प्रदान व्हावे

वॉशिंग्टन : भारतातील आर्थिक व्यवहारांचा पेमेंट सिस्टीमशी संबंधित सर्व डाटा भारतातच संग्रहित करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशांची अंमलबजावणी उंबरठ्यावर आलेली असतानाच अमेरिकेने ‘डाटा लोकेशन’ संकल्पनेला विरोध केला आहे.

ज्या देशात डाटा निर्माण होतो, त्याची साठवणूक त्याच देशात करण्याच्या पद्धतीला ‘डाटा लोकेशन’ असे म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या पेमेंट सिस्टिमसाठी ‘डाटा लोकेशन’ची सक्ती केली आहे. पुढील आठवड्यापासून हा निर्णय लागू हात आहे. डाटा साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत वित्तीय कंपन्यांना दिली होती. त्यानुसार, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या काही कंपन्यांनी भारतात डाटा साठवणूक केंद्रांची उभारणी केली आहे. काही अमेरिकी कंपन्यांनी मात्र या निर्णयास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकी कंपन्यांना पूरक भूमिका घेतल्याचे दिसते.

अमेरिकेचे व्यापार उप-प्रतिनिधी डेनिस शिया यांनी सांगितले, डाटा लोकेशनवर बंदी असावी, अशी आमची भूमिका आहे. सीमांची बंधने तोडून माहितीचे आदान-प्रदान व्हावे, देशा-देशात शिस्त असावी, डिजिटल व्यवहारांवर कुठल्याही प्रकारे कर लावण्यास कायमस्वरूपी बंदी असावी, असे आम्हाला वाटते.

‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज’मध्ये आयोजित कार्यक्रमात शिया यांनी हे वक्तव्य केले. डिजिटल व्यवहारांवरील शुल्काला सध्या असलेल्या सवलतीचा फेरविचार व्हावा अशी दक्षिण आफ्रिका आणि भारताची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेने एप्रिलमध्ये जारी केला होता आदेशभारतात डाटा साठवणूक केंद्रे उभारण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने एप्रिलमध्ये जारी केला होता. अमेरिकी वित्तीय कंपन्यांनी त्याविरुद्ध ट्रम्प प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे.डाटा साठवणूक केंद्र विदेशात ठेवून साठवलेला डाटा भारतातही पाहता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव कंपन्यांनी दिला होता. तो भारताने फेटाळून लावला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाInformation & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालय