शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

America's Abortion Row: तरुणी, महिलांकडून गर्भपाताचा अधिकार काढून घेण्याच्या हालचाली; या बड्या देशात लोक रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:46 IST

१९७३ च्या निकालात न्यायालयाने नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका करू घेण्यासाठी महिलांना संविधानीक अधिकार असल्याचे म्हटले होते.

अमेरिकेमध्ये सोमवारी पॉलिटिको नावाच्या जर्नलने मोठा धमाका केला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा ड्राफ्ट लीक करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, परंतू या रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालय गर्भपातावरील १९७३ च्या ऐतिहासिक रो विरुद्ध वेड प्रकरणाचा निर्णय बदलणार आहे. या बेंचमधील न्यायमूर्ती महिलांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेण्याच्या बाजुने आहेत. 

१९७३ च्या निकालात न्यायालयाने नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका करू घेण्यासाठी महिलांना संविधानीक अधिकार असल्याचे म्हटले होते. या वृत्तानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी मोठ्या प्रमाणावर लोक जमले आणि या येत असलेल्या निर्णयाला विरोध करू लागले आहेत. असे झाले तर एकाट झटक्यात अमेरिकेतील साडेतीन कोटी महिलांचा महत्वाचा अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील यास विरोध केला आहे. हा महिलांचा महत्वाचा अधिकार आहे. त्यांच्या गर्भासंबंधी त्या कार करू इच्छितात याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना हवा, असे बायडेन यांनी म्हटले आहे. दुसरीकडे पेच असा आहे, सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार काढून जरी घेतला तरी तो अमेरिकेच्या संघराज्यांना लागू करावा असे काही नाहीय. म्हणजे परत आपल्यासारखेच. केंद्र सरकार कायदा करते, तो लागू करायचा की नाही किंवा त्यात काही बदल करायचे हे ती राज्ये ठरविणार आहेत. परंतू अलबामा, जॉर्जिया, इंडियाना सह २४ संघराज्ये हा निर्णय लागू करण्याच्या बाजुने आहेत. 

भारतात काय आहे नियम...भारतात महिलांना 51 वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या परिस्थितीत सुरक्षित गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा 1971 मध्ये मंजूर झाला. 2021 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली, ज्या अंतर्गत महिलांच्या काही श्रेणींसाठी वैद्यकीय गर्भपातासाठी गर्भधारणा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत (पाच महिन्यांपासून सहा महिन्यांपर्यंत) वाढवण्यात आला. बलात्कार पीडित, अत्याचाराची बळी (जवळच्या नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार) किंवा अल्पवयीन मुलगी 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते. तिच्या किंवा गर्भाला धोका असल्यास, अपंगत्व किंवा अन्य काही समस्या असल्यासही गर्भपात करता येतो. 

टॅग्स :Abortionगर्भपातPregnancyप्रेग्नंसीAmericaअमेरिका