शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड कपचा थरार,  गुरुजी, आधी मॅच, मग तुमचे कीर्तन; अखेर वर्ल्डकप जिंकण्याचा जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:19 IST

बीएमएम अधिवेशन समाप्तीच्या दिशेने : समारोपात भेटणार क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि सौरभ नेत्रावळकर

थेट अमेरिकेतून अपर्णा वेलणकर

सान होजे : तिकडे बार्बाडोसच्या  ब्रीजटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मैदानाबाहेर चेंडू फटकावत सुटले होते आणि इकडे अमेरिकेत सान होजेमध्ये जमलेली मुंबई-पुण्याची, नाशिक-नागपूरची अमेरिकन माणसे  काळीज मुठीत घेऊन काळजीत पडली होती. बीएमएम अधिवेशनात शनिवारची सकाळ उजाडली ती टेन्शन घेऊनच!  इथल्या  स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता भारताने अखेरीस वर्ल्ड कप जिंकल्याचा जल्लोष उसळला आणि बाकी सगळे विसरून ठिकठिकाणच्या स्क्रीन्सवर डोळे लावून बसलेल्या गर्दीच्या जीवात जीव आला. मग सुरु झाले खरे सेलिब्रेशन! 

एकीकडे गाणे बहरले आहे, दुसरीकडे नृत्य रंगले आहे. इकडे गंभीर चर्चासत्रे सुरु आहेत, तिकडे स्पर्धा लढवल्या जात आहेत. नाटकाला जाऊ की शास्त्रीय संगीताची मैफल ऐकू अशा गोड पेचात सापडलेले उपस्थित या लयलुटीने थकून शेवटी खूप दिवसांनी भेटलेल्या यारदोस्तांशी गप्पांचे अड्डे टाकून बसले. ‘ भाई, एक कविता हवी आहे’ मध्ये मुक्ता बर्वे थकलेल्या तरी प्रसन्न पुलंना आणि सुनीताबाईनाच  घेऊन आली, तिने लोकांना रडवले. सारंग साठ्येने पोट दुखेतो  हसवले. मीना नेरुरकरांचे प्रभात सिनेदर्शन, गोविंदगिरी महाराज आणि शरद पोंक्षेंची  व्याख्याने, कौशल इनामदारांची मैफल, स्थानिक मंडळींनी केलेले ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ हे नाटक  आणि एकाचवेळी समांतर सत्रांमध्ये सुरु असलेले अनेकानेक कार्यक्रम यांनी बहरलेला शनिवार अजय-अतुल यांनी एका उंचीवर नेला. खाण्यापिण्याची लयलूट अनुभवलेल्या उपस्थितांच्या पोटाबरोबरच  मनही तृप्त होऊन गेले!

संपली का हो मॅच? गौर गोपाल दास यांना ऐकण्यासाठी खचाखच भरलेला हॉल ‘आधी मॅच संपू दे’ म्हणून इतका  ताटकळला होता, की शेवटी तिथला स्क्रीन क्रिकेटच्या फीडशी जोडला गेला. मॅच जिंकल्यावर नाचून-गाऊन झाले आणि गौर गोपाल दास नावाचे हसरे, प्रसन्न गुरुजी आपल्या व्याख्यानाला उभे राहिले.  म्हणाले, अहो काय करू, मला असा उशीर आवडत नाही..पण एक तरुण मित्र इथे येतानाच मला म्हणाला, गुरुजी, आधी मॅच बघा बरं का, मग तुमचं कीर्तन ऐकायला येतोच!

टॅग्स :World Cup Twenty20विश्वचषक ट्वेन्टी-२०