शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका... चीन... तैवान, तिरंग्याची सर्वत्र शान!, विविध देशांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 07:23 IST

Independence Day : जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. 

नवी दिल्ली : देशभरात ७५वा स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यात साजरा होत असतानाच परदेशातही तिरंगा डौलाने फडकला. विविध देशांतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयांत स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनीही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. सिंगापूरमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यातील आयएनएस शरयू हे जहाज दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी तिरंगा फडकावत देशभक्तिपर गीते सादर केली. सिंगापूरमधील भारतीयांनी रस्तोरस्ती तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. 

चीनमध्ये उत्साह चीनची राजधानी बीजिंगमधील भारतीय दूतावासात राजदूत प्रदीपकुमार रावत यांनी तिरंगा फडकवला.  यावेळी बीजिंगस्थित बहुतांश भारतीय उपस्थित होते. रावत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखवला.  गुंआंग्झू प्रांतातीत भारतीय उच्चायुक्तालयाचे उच्चायुक्त शंभू हक्की यांनी स्वलिखित ‘सबसे प्यारा देश मेरा’, हे गाणे सादर केले. अनेक चिनी अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छाअमेरिकेत भारतीयांचे प्रमाण लक्षणीय असलेल्या शहरांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा ही मोहीमही ठिकठिकाणी राबविण्यात आली. बोस्टन, कॅलिफोर्निया, ह्यूस्टन, वॉशिंग्टन या शहरांमध्ये तर उत्साहाचे वातावरण होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. 

इंग्लंडच्या पंतप्रधानांचा संदेश इंग्लंडचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तमाम भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  तसेच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर साबरमती आश्रमातील फोटो पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला.  भारताला उज्ज्वल भविष्य असल्याचा संदेशही जॉन्सन यांनी प्रसारित केला.  पूर्व लंडनमधील व्हार्फ बंदरावर आगमन झालेल्या आयएनएस तरंगिणी या जहाजावर तिरंगा फडकविण्यात आला. लंडनमधील भारतीयांनी तिरंगा रॅली काढली होती. 

- तैवान, बांगलादेश, नेपाळ, इस्रायल, कॅनडा, मालदीव, श्रीलंका या देशांमध्येही स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन