शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धीविषयक संधी देण्यासाठी अमेरिका करतेय भारतासोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 03:52 IST

माईक पॉम्पेव यांचे प्रतिपादन; ट्रम्प प्रशासनाची भारत-प्रशांत रणनीती

वॉशिंग्टन : भारताला आपली अर्थव्यवस्था वृद्धीच्या मार्गावर नेण्यास मदत व्हावी यासाठी अमेरिका भारतासोबत कठोर मेहनत घेत आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी केले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आखलेल्या भारत-प्रशांत रणनीतीचा हा भाग आहे, असेही पॉम्पेव म्हणाले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव वाढत असतानाच हे वक्तव्य अमेरिकेकडून आले आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व असल्याचे जाणकारांनी सांगितले. अमेरिकी उत्पादनांवर भारताने अलीकडेच लावलेले कर अस्वीकारार्ह असल्याचे जाहीर वक्तव्य अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. विकसनशील देशांच्या लाभासाठी अमेरिकेकडून चालविण्यात येणाऱ्या जनरलाईज्ड सिस्टिम आॅफ प्रेफरन्सेस (जीएसपी) कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या यादीतून भारताचे नाव ट्रम्प प्रशासनाने जूनमध्ये काढून टाकले आहे. अमेरिकेने भारताला व्यापारी प्राधान्य लाभ नाकारल्यानंतर भारताने प्रतिकारवाई करीत अमेरिकेच्या २८ वस्तूंवर ५ जून रोजी कर लावले होते. प्रत्याघाती कर लावण्यात आलेल्या वस्तूंत बदाम आणि सफरचंद यांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापारी तणाव आणखी वाढला आहे. जीएसपी हा अमेरिकेचा सर्वांत मोठा आणि सर्वांत जुना व्यापारी प्राधान्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत विकसनशील देशांतील हजारो वस्तूंना अमेरिकेत करमुक्त प्रवेश दिला जातो. अमेरिकेनेभारताला या कार्यक्रमातून बाहेर काढून ही कर सवलत नाकारली आहे.टीका आणि चर्चाहीच्पॉम्पेव यांचे वक्तव्य येण्याच्या काही आठवडे आधीच अमेरिकेचे दक्षिण आशिया आणि मध्य आशिया या भूभागासाठीचे सहायक व्यापार प्रतिनिधी क्रिस्टोफर विलसन यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या चर्चेत कर आणि शुल्क याविषयीचे मुद्दे प्रमुख होते, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प