पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चीनमध्येरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान पुतिन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये विशेष बैठकही झाली. मात्र यामुळे, आता अमेरिकेला मिरची लागली आहे. यावर ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांची प्रतिक्रिया आली आहे. भारतानेरशियासोबत नव्हे तर अमेरिकेसोबत रहायला हवे, असे नवारो यांनी म्हटले आहे.
'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, पीटर नवारो म्हणाले, "भारताने रशियासोबत नव्हे, तर आपल्यासोबत रहायला हवे. पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत काम करत आहेत. हे योग्य नाही." पंतप्रधान मोदी एससीओ शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबतही दिसले.
भारतावर अधिकचा टॅरिफ का, नवारो यांनी सांगितलं -यावेळी पीटर नवारो यांनी भारतावरील अतिरिक्त टॅरिफसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, "भारतासोबत दोन प्रकारच्या समस्या आहेत, यामुळेच अधिक टॅरिफ लादण्यात आला आहे. पहिले म्हणजे, तो अन्याय्य व्यापार करत आहे. यामुळे २५ टक्के कर लादण्यात आला आहे आणि दुसरे म्हणजे, तो रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यामुळेही २५ टक्के कर लादण्यात आला आहे."
युक्रेन युद्धासंदर्भात काय म्हणाले नवारो? - नवारो यांचे म्हणणे आहेकी, भारत, युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देत आहे. ते म्हणाले, तो रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि रशिया आपली कमाई युद्धासाठी खर्च करत आहे. खरे तर रशिया आणि युक्रेन यांच्या गेल्या 3 वर्षांहूनही अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. मात्र, यावर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पयांनीही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत बैठकही केली होती.