शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला युक्रेनमधील हवा आहे 'हा' खजिना; पण त्यावर रशियाचे आहे आधीपासूनच नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:12 IST

अमेरिकेत आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली आहे.

अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. सत्तेवर येताच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात मदतीच्या बदल्यात खनिजची मागणी केली आहे. सोमवारी त्यांनी याबाबत संकेत दिले, यामध्ये त्यांनी अमेरिकेचे समर्थन फक्त एका अटीवर मिळेल. युक्रेनमध्ये मिळत असलेल्या खनिजाबाबत एक करार करावा लागेल. या करारा अंतर्गत अमेरिकेला खनिज पुरवावे लागेल, असे संकेत दिले.

Gmail चं स्टोरेज फुल्ल झालंय? 'या' ट्रिक्सने स्टोरेज वाढवा

युक्रेनमध्ये मिळणारे खनिज कोणत्या खजिनापेक्षा कमी नाही. कारण याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य गोष्टी बनवण्यासाठी वापरल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनमधील जे खनिज हवे आहे, त्या खनिजाच्या ७० टक्के भागावर रशियाचे नियंत्रण आहे. 

वर्ष २०२३ मध्ये फोर्ब्सने एका अहवालात या खनिजाचे मुल्य १५ ट्रिलियन डॉलर असल्याचे सांगितले होते. यामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त  तीन प्रदेशांमध्ये आहेत - डोनेस्तक, लुहान्स्क आणि निप्रोपेट्रोव्हस्क. खनिजांच्या एकूण मूल्यापैकी कोळशाचा वाटा ६२ टक्के, लोहखनिजाचा वाटा १४ टक्के आणि उर्वरित मालमत्ता ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकूण खनिजांचे प्रमाण १११ अब्ज टन असल्याचा अंदाज आहे. सध्या या भागातील बहुतेक भाग रशियाच्या ताब्यात आहेत. आता युद्ध संपण्यापूर्वी युक्रेनला हे प्रदेश परत मिळवणे महत्त्वाचे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, अमेरिकेने युक्रेनला त्यांच्या युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा खूप जास्त लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे. आम्हाला युक्रेनशी एक करार करायचा आहे ज्याअंतर्गत आम्ही त्यांना जे काही देत ​​आहोत त्या बदल्यात ते आम्हाला त्यांचे दुर्मिळ खनिजे देतील. यावेळी ट्रम्प यांनी हा संदेश युक्रेनकडून आल्याचे सुचवले. आधुनिक उच्च तंत्रज्ञानाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या घटकांपर्यंत अमेरिकेला प्रवेश देण्यासाठी करार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले. 

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मला पृथ्वीवर आढळणाऱ्या या दुर्मिळ खनिजांचे जतन करायचे आहे. आपण शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करत आहोत. त्यांच्याकडे काही खरोखरच दुर्मिळ खनिजे आहेत आणि मला ही दुर्मिळ खनिजे जतन करायची आहेत. ते ते करण्यास तयार आहेत. 

या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियातील युद्ध लवकर संपवतील आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे, असं म्हणाले होते. 'आम्ही रशिया आणि युक्रेनवर खूप प्रगती केली आहे. बघूया काय होते ते. आम्ही हे युद्ध थांबवणार आहोत, असंही ट्रम्प म्हणाले होते. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका