शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:47 IST

America-Russia-Ukraiane : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने विविध चर्चांना उधाण आले आहे.

America-Russia-Ukraiane : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यातील वाद सर्व जगाने पाहिला. व्हाईट हाउसमध्ये या दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये जोरदार तुतू-मैमै झाली. या वादानंतर दोन गट तयार झाले असून, एक झेलेन्स्कींना तर दुसरा ट्रम्प यांना पाठिंबा देत आहे. आंतरराष्ट्रीय मीडियासमोर झालेल्या या वादाचे जगावर तीव्र पडसाद उमटणार असल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतात, 'उद्याची रात्र खूप मोठी असणार आहे. काय होईल, ते मी तुम्हाला सांगेन.' या पोस्टनंतर जगभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा बदला घेण्याची तयारी केली आहे की, पुतिन यांच्याशी भेट घेऊन नवीन काही योजना आखणार आहेत? अशाप्रकारचे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

विशेष म्हणजे, या पोस्टच्या तासाभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसंदर्भात आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणातात, 'रशियाला युक्रेनची जमीन न देणारे एकमेव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. लक्षात ठेवा की, जेव्हा कमकुवत आणि कुचकामी डेमोक्रॅट टीका करतात, तेव्हा फेक न्यूज पसरवली जाते,' अशा प्रकारची पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टचे विविध अर्थ लावले जात आहेत.

बैठकीत ट्रम्प-झेलेन्स्की वाद अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. झेलेन्स्कीने 'मिनरल्स' करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, त्यामुळे हे सर्व वाद झाल्याचे बोलले जात आहे. या वादानंतर अनेक देश झेलेन्स्कींच्या समर्थनार्थ पुढे आले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया