शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
3
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
4
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
5
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
6
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
7
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
8
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
9
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
10
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
11
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
12
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
13
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
14
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
15
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
16
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
17
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
18
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
19
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:54 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत. यातून फारच इंटरेस्टिंग अशी आकडेवारी समोर आली आहे. यातून समोर आलं की, ज्यो बायडन आणि त्यांच्या पतीचं २०२० मध्ये जेवढं उत्पन्न होतं, कमला हॅरिस आणि त्यांच्या पतीने त्यापेक्षा जास्त टॅक्स भरला आहे.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी जिल यांचं २०२० मध्ये एकूण उत्पन्न केवळ ६,०७,३३६ डॉलर इतकं होतं. हे २०१९ च्या तुलनेत ९,८५,२२३ डॉलरपेक्षा फारच कमी होतं. या जोडीने मिळून २०२० मध्ये एकूण १,५७,४१४ डॉलर इतका टॅक्स भरला आहे. 

दुसरीकडे उप-राष्ट्राध्यक्षा कमा हॅरिस आणि त्यांचे पती डाउग एमहॉफ यांचं २०२० मध्ये एकूण १६९५२२५ डॉलर इतकं उत्पन्न होतं. यानुसार त्यांनी एकूण ६,२१८९३ डॉलर इतका टॅक्स भरला. याप्रकारे हॅरिस कपलने जेवढा टॅक्स दिला, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीचं उत्पन्न त्यापेक्षा कमीच आहे.

दरम्यान, अमेरिकन कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांना परिवाराची आर्थिक माहिती सार्वजनिक करायची असते. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीने ३०,७०४ डॉलरची रक्कम चॅरिटीमध्ये दिली आहे. ही रक्कम त्यांच्या उत्पन्नाच्या ५.१ टक्के भाग आहे.

यासोबतच दोन्ही परिवारांनी वेगवेगळ्या राज्यांमध्येही काही इन्कम टॅक्स दिले आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि त्यांच्या पत्नीने डेलावेअरमध्ये २८,७९४ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे. तसेच त्यांच्या पत्नीने व्हर्जिनीयामद्येही ४४३ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे.

त्याचप्रमाणे कमला हॅरिस आणि त्यांच्या पतीने कॅलिफोर्नियामध्ये साधारण १२५,००४ इन्कम टॅक्स भरला आहे. हॅरिस यांचे पती डाउग एमहॉफ यांनी कोलंबियामध्ये ५६९९७ डॉलर इन्कम टॅक्स भरला आहे. या कपलने चॅरिटीसाठी २७,००६ डॉलर दिले आहेत.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाIncome Taxइन्कम टॅक्स