शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

America on Pakistan:'पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक', जो बायडेन यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 13:40 IST

America on Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

America on Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पाकिस्तानबाबत (Pakistan) मोठे वक्तव्य केले आहे. 'माझ्या मते पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. ते कोणत्याही देखरेखीशिवाय अण्वस्त्रे बाळगतात,' असे वक्तव्य बायडन यांनी केले आहे. डेमोक्रॅटिक काँग्रेस प्रचार समितीच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रशियावरही टीका केली.

पाकिस्ताकडे 160 अण्वस्त्रेपाकिस्तानबाबत बायडेन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा जगात अणुयुद्धाची चर्चा सुरू आहे. पाकिस्तान आपल्याकडे सातत्याने अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानकडे 160 अण्वस्त्रे आहेत. जागतिक स्तरावर बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे. द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी बायडेन यांचे वक्तव्य निराधार असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांची रशियावरही टीकाअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'क्यूबा मिसाइल संकटानंतर एखादा रशियन नेता अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देऊ शकतो, असा विचार कधी केला होता का. त्यांनी हजारो लोकांनाही ठार केले. कोणी विचार केला होता की, आपण अशा परिस्थिती येऊ, जिथे रशिया, भारत आणि पाकिस्तानसह चीनही आपली भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.'

जग अमेरिकेकडे आशेने पाहत आहे

व्हाईट हाऊसनुसार, बायडेन पुढे म्हणाले की, 'जग वेगाने बदलत आहे. देश त्यांच्या युतींचा पुनर्विचार करत आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की जग अमेरिकेतडे आशेने पाहत आहे. आपण काय करतो, हे पाहण्यासाठी आपले शत्रू देखील आपल्यावर लक्ष ठेवून असतात. बरेच काही पणाला लागले होते. जगाला पूर्वी कधीही नव्हत्या अशा ठिकाणी नेण्याची क्षमता अमेरिकेत आहे,' असेही बायडन म्हणाले. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान