America-Israel-Iran War: अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धाला आज अखेर अल्पविराम लागला आहे. अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, काही तासांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी धमकी दिली होती. त्यानंतर आता अचानक युद्ध थांबल्याने जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. बहुतांश देशांनी याचे स्वागत करत दिलासा व्यक्त केला आहे. तसेच, या प्रक्रियेत पाकिस्तानच्या कूटनीतिक भूमिकेचा अनेक देशांनी उल्लेख करत कौतुकही केले आहे.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अलबानीस आणि परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांनी संयुक्त निवेदनात म्हटले की, तणाव कमी करण्यासाठी आणि संघर्ष संपवण्यासाठी आम्ही दीर्घकाळापासून प्रयत्न करत होतो. होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर टीका करत त्यांनी अशा भाषेमुळे चिंता वाढू शकते असे म्हटले.
मलेशिया
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी या कराराचे स्वागत करत याला जागतिक शांततेसाठी सकारात्मक पाऊल म्हटले. त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक करत म्हटले की, पाकिस्तानची कूटनीती धाडसी असून त्यांनी निष्पक्षपणे सर्व पक्षांशी संवाद साधला.
इजिप्त
इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने या युद्धविरामाला महत्त्वाची संधी असे संबोधले असून, संवाद आणि कूटनीतीद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
जपान
जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरी किहारा यांनी या घोषणेला सकारात्मक पाऊल म्हटले.
न्यूझीलंड
परराष्ट्र मंत्री विनसेंट पीटर्स यांनी सावध आशावाद व्यक्त करत सांगितले की, स्थायी युद्धविरामासाठी अजून काम करणे आवश्यक आहे. त्यांनी पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्त यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाने या निर्णयाचे स्वागत करत मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कजाकिस्तान
राष्ट्राध्यक्ष कासीम जोमार्ट टोकायेव यांनी या युद्धविरामासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या मध्यस्थीचे विशेष कौतुक केले.
संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरास यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. नागरिकांचे संरक्षण आणि मानवी मदत पोहोचवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : America and Iran declared a two-week ceasefire after escalating tensions. Global leaders welcomed the move, emphasizing dialogue. Pakistan's diplomatic efforts were lauded by Malaysia and Kazakhstan, among others, for facilitating communication between parties and contributing to de-escalation.
Web Summary : अमेरिका और ईरान ने बढ़ते तनाव के बाद दो सप्ताह के युद्धविराम की घोषणा की। वैश्विक नेताओं ने संवाद पर जोर देते हुए इस कदम का स्वागत किया। मलेशिया और कजाकिस्तान सहित अन्य लोगों ने पाकिस्तान के राजनयिक प्रयासों की सराहना की, क्योंकि इससे पार्टियों के बीच संचार आसान हुआ और तनाव कम हुआ।