शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:58 IST

व्यापार युद्ध सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर जगभरात व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. यानंतर आता ट्रम्प आपला निर्णय कसा योग्य आहे, हे सांगताना दिसत आहेत. आता, टॅरिफ संदर्भातील आपल्या निर्णयामुळे अमेरिकेला रोज अब्जावधी डॉलर्सची कमाई होत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने नुकतच चीनला 104 टक्क्यांचा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. जो मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू झाला आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफचा परिणाम "स्फोटक" असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊस येथे खासदार आणि मंत्र्यांसह चर्चा केली. ते म्हणाले, आपण टॅरिफ संदर्भात घेतेलेले निर्णय अमेरिकेचे उद्योग पुन्हा एकदा बळकट करण्यासाटी महत्वाचे होते. ट्रम्प यांनी आधीच 60 देशांविरुद्ध टॅरिफ वाढवला आहे. एवढेच नाही तर, "एवढा पैसा येत आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता," असेही ट्रम्प म्हणाले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टॅरिफच्या मदतीने रोज 2 बिलियन डॉलर एवढी कमाई होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, नेमक्या कोणत्या टॅरिफमुळे महसूल एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत झाली? हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

चीनवर 104 टक्के टॅरिफ -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी, व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४% टॅरिफ लादला असून, तो मंगळवारी मध्यरात्रीपासून अर्थात ९ एप्रिलपासून लागू झाला आहे. जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५०% कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे.

आम्हीही व्यापार युद्धासाठी तयार - चीन अमेरिका आमच्यावर लादत असलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. जर व्यापार युद्ध झाले तर चीन पूर्णपणे तयार आहे. अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम होईल, पण आकाश कोसळणार नाही, असे चीनने म्हटले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध