शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

Corona Virus : कोरोना रिटर्न! अमेरिकेचं टेन्शन वाढलं; रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण, धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:43 IST

Corona Virus : तज्ज्ञांनी पुन्हा एकदा COVID-19 उद्रेकांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या नवीन लाटेचा परिणाम शाळा, कामाची ठिकाणे आणि स्थानिक सरकारवर पुन्हा एकदा झाला आहे. तज्ज्ञांनी पुन्हा एकदा COVID-19 उद्रेकांसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या ताज्या आकडेवारीनुसार, 12 ऑगस्ट रोजी संपलेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत हॉस्पिटलायझेशनच्या संख्येत 24% वाढ झाली आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, सांडपाण्यावर नजर ठेवल्याने असे दिसून आले आहे की अमेरिकेतील पश्चिम आणि ईशान्येमध्ये कोविड संसर्गामध्ये अलीकडेच वाढ झाली आहे. प्रीस्कूल, उन्हाळी शिबिरे आणि यूएसमधील कार्यालयांमध्ये उद्रेक वाढला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, कोरोना रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अजूनही तुलनेने कमी आहे आणि बहुतेक आजारी लोकांना सर्दी किंवा फ्लूच्या तुलनेत सौम्य लक्षणे जाणवत आहेत.

या महिन्यात नॅशविलमध्ये अनेक लोकांना कोविडची लागण झाली आहे, ज्यामध्ये नगर परिषद सदस्य, शहर कर्मचारी आणि रिपोर्टर यांचा समावेश आहे. अलिकडच्या दिवसात विद्यार्थी शाळेत परतले असल्याने, बहुतेक प्रशासकांनी सूचित केले आहे की ते मास्क आणि टेस्टचा समावेश असलेल्या कठोर नियमांकडे परत जाण्याची योजना नाही. अधिकारी सहसा पालकांना त्यांची मुले आजारी असल्यास घरी ठेवण्यास सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हवा नाही तर आता पाण्यातही सापडला कोरोना; WHO ने दिला धोक्याचा इशारा

WHO ने कोरोना व्हायरसबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. गेल्या एका महिन्यात, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. अलीकडेच WHO ने 17 ऑगस्ट रोजी कोरोनाच्य़ा BA.2.86 व्ह्रेरिएंटला निगराणीखाली ठेवलं होतं. युरोप, आफ्रिका आणि अमेरिका या भागांतून या व्हेरिएंटचे 9 वेगवेगळे सीक्वेन्स सापडले आहेत. या व्हेरिएंटमधून मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नसली तरी BA.2.86 कोरोना व्हेरिएंट थायलंड आणि स्वित्झर्लंडमध्ये पाण्यात सापडला आहेत. हा व्हेरिएंट देखरेखीखाली आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या कोरोनामुळे फारशी हानी होत नाही, मात्र पाण्यात आढळल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका