शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 23:54 IST

"आता इलॉन मस्क यांची आपल्यासोबत बोलण्याची इच्छा आहे. मात्र आपण चर्चेसाठी तयार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे..."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांच्यातील वाद वाढल्यानंतर, आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान हे दोन्ही नेते एकमेकांची प्रचंड स्तुती करत होते. ते आता उघडपणे समोरा-समोर आले आहेत. यातच, आता इलॉन मस्क यांची आपल्यासोबत बोलण्याची इच्छा आहे. मात्र आपण चर्चेसाठी तयार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय' -एबीसी न्यूज चॅनलला शुक्रवारी दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, इलॉन मस्क यांचे डोके फिरले आहे. तत्पूर्वी, वृत्त आले होते की, व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी वाद संपवण्यासाठी ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात ६ जून रोजी बैठकीचे नियोजन केले आहे. मात्र, जेव्हा ट्रम्प यांना या बैठकीच्या वेळापत्रकासंदर्भात विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी इलॉन मस्क यांना भेटण्यास नकार दिला.

उघडपणे समोरा समोर आले आहेत ट्रम्प-मस्क -ट्रम्प गुरुवारी म्हणाले होते, आपण इलॉन मस्क यांना बरीच मदत केली आहे. मात्र आपण आता मस्क यांच्यावर नाराज आहोत. त्यांनी दावा केला की, मस्क ईव्ही टॅक्स इन्सेटिव्ह हटवल्याने नाराज आहेत. यावर, मस्क यांनी दावा केला की, या विधेयकासंदर्भात आपल्याला एकदाही माहिती देण्यात आली नाही आणि ते मध्यरात्री पासही करण्यात आले. एवढेच नाही तर, माझ्यामुळेच ट्रम्प निवडणूक जिंकले. जर मी नसतो, तर ट्रम्प यांचा पराभव निश्चित होता, असेही मस्क यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिकाUSअमेरिका