शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

White House Toilet: डोनाल्ड ट्रम्पमुळे व्हाईट हाऊसचे 'टॉयलेट' चर्चेत, जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:43 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृत्यामुळे टॉयलेट चर्चेत आले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले 'व्हाईट हाऊस' अनेकदा चर्चेत असते. आताही आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये व्हाईट हाऊसची चर्चा सुरू झाली आहे. पण, ही चर्चा आता एका वेगळ्याच कारणामुळे होत आहे. व्हाइट हाऊस चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, याचे 'टॉयलेट' आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की, व्हाईट हाऊसच्या टॉयलेटमध्ये असे काय आहे, की ज्याची आंतरराष्ट्रीय मीडियात चर्चा सुरू झाली आहे. बरं, हे टॉयलेट लक्झरी असल्याने याची चर्चा नाही, तर याची चर्चा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृत्यामुळे टॉयलेट चर्चेत असून, ट्रम्प यांच्यावर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

नेमकं काय झालं?काही मीडिया हाऊसने व्हाईट हाऊसबद्दल एक खुलासा केला आहे. यात डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर असताना त्यांनी काही महत्वाची कागदपत्रे फाडून टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी इतके पेपर फ्लॅश केले की, त्यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेट जाम झाले. ही माहिती समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले असून सर्व दावे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

पुस्तकात दावान्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार मॅगी हेबरमनने तिच्या आगामी पुस्तक 'कॉन्फिडन्स मॅन'मध्ये व्हाईट हाऊसबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या पुस्तकात असे म्हटले आहे की व्हाईट हाऊसच्या कर्मचार्‍यांनी सांगितले की, ट्रम्प अनेकदा टॉयलेटमध्ये कागदपत्रे टाक असे. या कागदपत्रांमुळे अनेकदा टॉयलेट जाम व्हायचे. असे मानले जाते की, ती कागदपत्रे ट्रम्प यांनी फ्लश केली होती. स्व    च्छता करताना टॉयलेटमध्ये अनेक छापील कागदपत्र सापडल्यानंतर ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प