शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:38 IST

धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यातच अमेरिका आणि चीन यांचे संबंध टोकाचे ताणल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी चीनविरोधात टॅरिफची घोषणा केल्यानंतर, शी जिनपिंग यांनीही प्रत्युत्तरात अमेरिकेविरोधात टॅरिफची घोषणा केली. एवढेच नाही तर, आता धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले.

यासंदर्भात बोलताना चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की, "बिजिंग वॉशिंग्टनसोबत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र ही चर्चा परस्पर आदर आणि सन्मानाने व्हायला हवी." मंत्रालयाचे प्रवक्ते ही योंगकियान म्हणाले, "दबाव, धमक्या आणि ब्लॅकमेलिंग हे चीनचा सामना करण्याचे योग्य मार्ग नाहीत."

काय म्हणाले ट्रम्प -चीनसंदर्भात मवाळ भूमिका घेत ट्रम्प म्हणाले, शी जिनपिंग हे स्मार्ट व्यक्ती आहेत आणि आम्ही चांगली डील करू. यावेळी शी जिनपिंग हे जगातील सर्वात चतुर व्यक्तींपैकी एक असल्याचेही ते म्हणाले. व्हाइट हाऊसबाहर पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, शी एक असे व्यक्ती आहेत, ज्यांना काय करायला हवे, हे चांगल्या प्रकारे समजते आणि त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. तसेच, आपण थेट शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. कोणत्याही क्षणी एक फोन येईल आणि त्यानंतर ही शर्यत संपुष्टात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका-चीन टॅरिफ वॉर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला चीन विरोधात 34 टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर 34 टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर 104 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ 34 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, 10 एपिरैलपासून लागू झाला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगchinaचीनAmericaअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध