शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 12:11 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांवर लवकरात लवकर गंभीर कारवाई करा, असंही अमेरिकेनं पाकला सांगितलं आहे. भारतावर आणखी एका दहशतवादी हल्ल्याचा तुम्ही विचार जरी केलात, तर तुमच्या प्रचंड अडचणी वाढतील, असे खडे बोल अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावले आहेत. व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे.पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाविरोधात कारवाईची करण्याची आवश्यकता आहे. जर पाकिस्ताननं दहशतवादावर कारवाई केली नाही आणि भारतावर आणखी एक हल्ला झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकते.भारतानं पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्ताननं काही कारवाई केली आहे. काही दहशतवाद्यांची संपत्ती जप्त केली आहे, तर काहींना अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या काही सुविधांवरही पाकिस्ताननं निर्बंध आणले आहेत. परंतु एवढ्यावरच न थांबता पाकिस्ताननं आणखी आक्रमक कारवाई करावी, असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला