शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस दुस-यांदा बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 07:27 IST

न्यू यॉर्क : अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे दुस-यांदा काही काळासाठी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत, अशी माहिती वॉल स्ट्रीट जनरलनं दिली आहे.

न्यू यॉर्क : अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे दुस-यांदा काही काळासाठी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत, अशी माहिती वॉल स्ट्रीट जनरलनं दिली आहे. शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार खुलताच अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनी 13.5 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे बेझोस यांची संपत्ती 90 अब्ज डॉलरच्या पार गेली. तसेच बिल गेट्स यांची संपत्ती 89 अब्ज डॉलरच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चे सीईओ जेफ बेझोस हे काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील ‘औटघटकेचा राजा’ होण्याचे भाग्य लाभले होते.‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ही माहिती जारी केली होती. फोर्ब्सने म्हटले की, जेफ बेझोस यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील हा औटघटकेचा राजमुकुट मिळाला. अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत १,0८३.३१ डॉलर झाली होती.त्यामुळे बेझोस हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर अ‍ॅमेझॉनचे समभाग पुन्हा १ टक्क्याने घसरून १,0४६ डॉलरवर आले होते. त्यामुळे बोझेस हे पुन्हा दुस-या स्थानी जाऊन बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आले.अ‍ॅमेझॉनमध्ये बेझोस यांच्या मालकीचे 80 दशलक्ष समभाग आहेत. एकूण समभागांच्या तुलनेत त्यांच्या समभागांचे प्रमाण 17 टक्के आहे. जेव्हा अ‍ॅमेझॉनचे समभाग तेजाळून सर्वोच्च पातळीवर गेले, तेव्हा बेझोस यांच्याकडील समभागांची किंमत 87अब्ज डॉलरवर गेली होती. एका होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ची मालकीही बेझोस यांच्याकडेच आहे.फोर्ब्सने म्हटले की, सकाळी बाजार उघडला तेव्हा बेझोस यांच्या संपत्तीचे मूल्य 90.6 अब्ज डॉलर होते. त्याचवेळी बिल गेट्स यांच्या संपत्तीचे मूल्य 90.1 अब्ज डॉलर होते. वास्तविक बिल गेट्स हे सध्याच्या जगातील खरे अव्वल क्रमांकाचे श्रीमंत आहेत. त्यांनी सेवाकार्यासाठी अब्जावधी डॉलर दान दिले आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती बरीच कमी झाली आहे.ताज्या प्रगती पुस्तकात अ‍ॅमेझॉनच्या तिमाही नफ्यात ७७ टक्क्यांची घट झाली आहे. अमाप खर्चामुळे कंपनीचा नफा घटला आहे. त्याचा फटका बसून कंपनीचा समभाग घसरल्याचे सूत्रांनी सांगितले. वॉलस्ट्रीटच्या अपेक्षा पूर्ण न करता आल्यामुळे कंपनीला आणखी 2 टक्क्यांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Americaअमेरिकाshare marketशेअर बाजार