शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दुबईतील भारतीय शेफला डच्चू, इस्लामविरोधी ट्विट केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 17:58 IST

इस्लामविरोधी ट्विट केल्याप्रकरणी दुबईतील जेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलमध्ये काम करणा-या भारतीय शेफला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : इस्लामविरोधी ट्विट केल्याप्रकरणी दुबईतील जेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलमध्ये काम करणा-या भारतीय शेफला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. अतुल कोचर असे या शेफचे नाव आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची भूमिका असलेल्या क्वांटिको मालिकेतील एका भागात हिंदू राष्ट्रभक्तांना दहशतवादी संबोधण्यात आले होते. मात्र, याबाबत प्रियांका चोप्राने ट्विटरवर माफी मागितली होती. प्रियांका चोप्राच्या ट्विटला अतुल कोचर यांनी रिट्विट केले होते. या रिट्विटमध्ये अतुल कोचर यांनी लिहिले होते की, हे फारच दुखदायक आहे. गेल्या 2000 वर्षांपासून इस्लाममधून दहशतवादी निर्माण होत असताना हिंदूंना दहशतवादी संबोधून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 

अतुल कोचर ट्विटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर ते ट्विट डिलीट करत अतुल कोचर यांनी माफीसुद्धा मागितली. कोचर म्हणाले, माझ्या टि्वटची मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी माझी चूक कबूल करतो. इस्लामची सुरुवात 1400 वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. मी इस्लामविरोधी नाही. मला माझ्या विधानांवर खेद आहे. 

जेडब्‍ल्यू मेरियट हॉटेलने अतुल कोचर यांच्या विधानांपासून हात झटकले आहेत. अतुल कोचर यांच्या विधानांची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही त्यांच्या विधानांचे समर्थन करत नाही. आमचे हॉटेल सर्वसमावेशक असून, विविध संस्कृतीच्या प्रतीकाचा हॉटेलला गर्व आहे, असे यासंदर्भात हॉटेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र, आता  इस्लामविरोधी ट्विट असल्याचे कारण देत त्यांना जेडब्ल्यू मार्किस हॉटेलमधून नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. हॉटेलचे व्यवस्थापक बिल केफर म्हणाले की, अतुल कोचर यांच्या ट्विटनंतर आम्ही त्यांचा करार रद्द केला आहे. आता ते हॉटेलमध्ये काम करु शकणार नाहीत.   

टॅग्स :Priyanka Chopraप्रियांका चोप्राInternationalआंतरराष्ट्रीयhotelहॉटेलDubaiदुबईIslamइस्लामHinduismहिंदुइझम