शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 09:54 IST

Aliens Exist: एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

परग्रहवासी म्हणजेच एलियन्स अस्तित्वात आहेत की नाहीत याबाबाबत बऱ्याचदा चर्चा झड़तात. कोणी फोटो, कोणी व्हिडिओ पोस्ट करत आकाशात यान दिसल्याचे दावे केले जातात. आता इस्त्रायलच्या संशोधकाने मोठा खळबळजनक दावा केला आहे. एलियन्स पृथ्वीवर लपले असून ब्रम्हांडातील एलियन्स हे अमेरिका आणि इस्त्रायलसोबत संपर्कही असल्याचे म्हटले आहे.

 इस्त्रायलचे माजी अंतराळ सुरक्षा मोहिमेचे प्रमुख हैम इशेद यांनी हा दावा केला आहे. त्यांनी एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा करत ते पृथ्वीवर लपल्याचेही म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची घोषणा करणार होते, मात्र त्यांना एलियन्सनीच रोखल्याचे इशेद यांनी म्हटले आहे. एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. 

हे परग्रहवासी अमेरिकी एजंटांसोबत मिळून ब्रम्हांडाची माहिती शोधू इच्छित आहेत. मानवजाती एलियन्सचे अस्तित्व स्वीकारण्यास तयार नसल्याने याची घोषणा करू  नये असे एलियन्सना सांगण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प याची घोषणा करणार होते, मात्र त्यांना फेडरेशनच्या एलिअन्सनी वाट पाहण्यास सांगितले. लोकांमध्ये गोंधळ, गडबड होईल ते नको असल्याचे या एलियन्सनी अमेरिकेला सांगितले. पृथ्वीवरील मनुष्याने आधी मनाची तयारी करावी, समजूतदार व्हावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही  इशेद म्हणाले. 

माझ्य़ाकडे गमावण्यासारखे काहीच नाही....इशेद यांनी सांगितले की, मी जिथे जिथे ही माहिती घेऊन गेलो तिथे मला वेडा ठरविण्यात आले. माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. मला माझी डिग्री, पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विश्वविद्यापीठांनी मला गौरविले आहे. इशेद यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पृथ्वीला अणुयुद्धाच्या धोक्यापासून एलियन्सनीच वाचविल्याचा दावा केला आहे. 

इशेद हे इस्त्रायलच्या संस्थेत तीस वर्षे कार्यरत होते. ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना स्थानिक मीडियाने 'इस्त्रायलच्या सॅटेलाइट कार्यक्रमाचा जनक' म्हटले होते. ते 2011 मध्ये निवृत्त झाले होते. 

एलियन्सने सही देखील केली...मंगळ ग्रहावरील खोलगट भागात एलियन्सचा अड्डा आहे. तेथे अमेरिकेचे प्रतिनिधी आणि एलियन्स राहतात. आपल्यासोबतही एलिन्सही करार केले आहेत. यावर त्यांची सही आहे. त्यांना ब्रम्हांडाच्या शोधासाठी मदत हवी आहे, असा दावाही इशेद यांनी केला आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पMarsमंगळ ग्रहIsraelइस्रायल