शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

'१२ तास काम'नंतर 'कामजीवन'; जॅक मा यांचा '669' फॉर्म्युला वाचून हातच जोडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:58 IST

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचा कर्मचाऱ्यांना सल्ला

नवी दिल्ली: आपल्या धोरणांमुळे कायमच चर्चेत राहणारे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी सकाळी 9 ते रात्री 9 काम करण्याचं सूत्र सांगणाऱ्या मा यांनी आता 669 चं सूत्र सांगितलं आहे. आठवड्यातल्या सहा दिवसात सहावेळा सेक्स करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे आयुष्य अधिक सुखकर होईल, असा दावा त्यांनी केला. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जगातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या जॅक मा यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बोलताना '669' चं सूत्र सांगितलं. 'माणसानं काम करताना 996 चं सूत्र लक्षात ठेवावं. आठवड्याचे सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ असं बारा तास काम करावं. तर वैयक्तीक आयुष्यात 669 चं सूत्र अंमलात आणावं. आठवड्यातले सहा दिवस सहावेळा सेक्स करावा,' असं मा म्हणाले.  54 वर्षांचे जॅक मा कंपनीतर्फे दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. 10 मे रोजी हा सोहळा आयोजित केला जातो. मा यांच्या '996' सूत्रावर तंत्रज्ञान उद्योगातून जोरदार टीका झाली होती. इतका वेळ काम करणं शक्य नसल्याचं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. यानंतर आता मा यांच्या '669' सूत्रावर सोशल मीडियानं टीकेची झोड उठवली आहे. 996 सूत्र अंमलात आणल्यावर 669 साठी कोणाकडे वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहील, असा सवाल अनेकांना उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवन